यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील छात्र अध्ययन यात्रेसाठी नऊ विद्यार्थ्यांची निवड
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बी. ए. भाग ३ व एम. ए. भाग २ (हिंदी) विभागात शिक्षण घेणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांची केंद्रीय हिंदी निदेशालय, दिल्ली द्वारा अहिंदी भाषा छात्र अध्ययन यात्रेसाठी निवड झाली आहे. सदरची छात्र अध्ययन यात्रा दिनांक १८/०३/२०२४ ते २३/०३/२०२४ पर्यंत छत्तीसगड येथील सांपा व बिलासपुर या ठिकाणी संपन्न होणार आहे. यामध्ये १) अमोल सरवदे २) मुस्ताक शेख ३) आशिष पोळ ४) कु. सुजाता शिंदे ५) कु. सिमरन पठाण यांची यांची यात्रेत सहभागी होत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव मा. श्री. विलासरावजी घुमरे (सर), अध्यक्ष प्राचार्य श्री. मिलींद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, प्रा. डॉ. विनायक खरटमल यांनी अभिनंदन केले. सदर अध्ययन यात्रेमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी उपप्राचार्य व विभाग प्रमुख डॉ. अनिल साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
