ताज्या घडामोडीराजकीय

औषधनिर्माण शास्ञ पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता उडणार विद्यार्थ्यांची झुंबड- प्रा.रामदास झोळ. • 25 हजार जागांसाठी तब्बल 75 हजारांपेक्षा जास्त अर्ज.

तंञशिक्षण संचालनालयाने 15 सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहिर केली आहे त्यामध्ये औषधनिर्माण शास्ञ या अभ्यासक्रमासाठी 75 हजारांपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत व महाराष्ट्र राज्यातील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता हि फक्त 25 हजार आहे, त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये झुंबड उडणार आहे असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन्एडेड इन्स्टिट्यूटस इन रुरल एरिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले आहे.

सध्या संपूर्ण भारत देशामध्ये औषधनिर्माण शास्त्राला महत्त्व प्राप्त झाले आहे कारण पदविका औषध निर्माण शास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचे मेडिकलचे दुकान व त्याच बरोबर मॉल हि उघडता येतो, तसेच भारत देशातून इतर देशांना औषधांची निर्यात होत असल्याने औषध निर्माण कंपन्यांची संख्या भारत देशात वाढत आहेत त्यामुळे विविध औषधनिर्माण कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा फार्मसी क्षेञाकडे कल जास्त आहे हे या क्षमतेपेक्षा तीन चार पट अर्ज जास्त आले आहेत यावरुनच समजते असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरोणा महामारीच्या काळात आरोग्य विभागाला व ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी वाढता कल हा ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त दिसत आहे त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये झुंबड उडणार आहे असे मत प्रा.झोळ सर यांनी व्यक्त केले.
तरी तंञशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावरील वेळापञकाचे विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन करुन त्याप्रमाणे आपल्या प्रवेशासंदर्भात वेळोवेळी कार्यवाही करुन प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्रा.झोळ सर यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!