शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे करमाळा तालुक्यातील पत्रकारांना मेडिकल हेल्प किटचे वाटप गरजू रुग्णांनी वैद्यकीय मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला संपर्क साधण्याचे आवाहन
करमाळा (प्रतिनिधी )
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्याचा महायज्ञ सुरू असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना मेडिकल हेल्प कीट वाटप करीत असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली शिवसेना नेते एकनाथराव शिंदे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने ह्या या हेल्प किटचे वाटप सुरू आहे आज करमाळ्यातील सर्व पत्रकारांना या किटचे वाटप करण्यात आले यावेळी ग्राम सुरक्षा दलाचे महाराष्ट्राचे संचालक बीके गोरडे उपस्थित होते यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की मुंबईतील शिवसेना भवन मधून या वैद्यकीय मदत कक्षाचे काम सुरू असून ज्या गरजू रुग्णांना मदतीची गरज आहे अशांनी या कक्षाची संपर्क साधावा आज कोरोना काळात ग्रामीण भागातील पत्रकारांनी आपल्या जीवाची काळजी न करता सर्वसामान्यांना मदत मिळवणे रुग्णांना बॅड मिळवून देणे ऑक्सीजन मिळवून देणे हेसुद्धा कामे पत्रकारिता करत असताना केली यामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना सन्मान म्हणून हे किट देण्यात येत आहे यावेळी पत्रकार संघाचे सचिव नासीर कबीर म्हणाले की शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्यावतीने करमाळा तालुक्याला एक अद्यावत ऍम्ब्युलन्स देण्यात आली आहे त्याच प्रमाणे जवळपास दोनशे वीस रेवडी सिर इंजेक्शन्स गरीब व गरजू रुग्णांना मोफत देण्यात आले त्याचबरोबर प्रत्येकी 75 हजार रुपये किमतीच्या ऑटोमॅटिक सहा ऑक्सिजन स मशीन्स मोफत देण्यात आल्या शिवाय मास्टर सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने कोरोना काळात सर्वसामान्याला मदत केली आहे यावेळी युवा सेनेचे तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे पत्रकार प्राध्यापक अशोक नरसाळे पत्रकार दिनेश मडके यांनी विचार व्यक्त केले यावेळी युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड शहर प्रमुख संजय शीलवंत पत्रकार अश्पाक सय्यद अलीम शेख अशोक पोळ सागर गायकवाड सिद्धार्थ वाघमारे आधीच बहुतांश पत्रकार उपस्थित होते.
