सणासुदीचे दिवस असल्यामुळे पुर्णवेळ दुकाने चालु करण्याची परवानगी देऊन व्यापारी वर्गाला दिलासा देण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाच्या नावाखाली निर्बंध असल्यामुळे व्यापारी वर्गाची त्यावर अवलंबुन असणाऱ्यांची अक्षरशः वाट लागली असुन पहिली लाट दुसरी लाटच्या नावाखाली प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार आम्ही पालन केले परंतु आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असुन पुणे मुंबई यासारख्या शहरात सरकारने पुर्ण वेळ दुकाने चालु करण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे करमाळा शहरातील दुकाने पुर्ण वेळ चालू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करमाळा शहरातील व्यापारी वर्गातुन होत आहे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे नागरिक खरेदीसाठी बाजारात येत आहेत अशा परिस्थितीत जास्त गर्दी न करता आपल्या सोयीनुसार प्रत्येकाला खरेदी करण्यासाठी वेळ आवश्यक असुन सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही वेळ अपुरा आहे.
नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तसेच व्यापारी वर्गाला व कर्मचारी वर्गाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कर्मचारी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.आधिच पाच दिवसांचा आठवडा असल्यामुळे या व्यवसायावर मोठी सक्रांत आली आहे.दोन वर्ष कोरोनामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून या परिस्थितुन पुन्हा बाहेर पडुन व्यवसाय टिकवण्यासाठी व त्यावर अवलंबुन असणाऱ्यांना जगवण्यासाठी व सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून करमाळा शहराचा पाॅझिटिव्ह दर अत्यंत कमी असुन करमाळा शहरात कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून पुर्ण वेळ दुकाने चालु करण्याची परवानगी देऊन कर्मचारी व व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
