कोरोणामुळे दोन्ही पालकत्व गमावलेल्या करमाळा तालुक्यातील अनाथ विद्यार्थ्यांना दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे मोफत शिक्षण देणार- प्रा.रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी
प्रा.प्रविण अंबोधरे
कोरोणामुळे दोन्ही पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांना दत्तकला शिक्षण संस्थेत मोफत शिक्षण दिले जाणार आहे अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन्एडेड इन्स्टिट्यूटस इन रुरल एरिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी दिली आहे.
करमाळा तालुक्यातील कोरोणा महामारीमुळे इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आईवडील मृत्यू झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेत इंजिनिअरिंग (पदविका,पदवी,व पदव्युत्तर), फार्मसी (पदविका,पदवी,व पदव्युत्तर), मॅनेजमेंट (पदव्युत्तर) स्कुल (एस एस सी व सीबीएसई) या विभागाचे व्यावसायिक शिक्षण कोणतेही शैक्षणिक शुल्क आकारले जाणार नाही अशी माहिती प्रा.रामदास झोळ यांनी दिली आहे,
यावेळी बोलताना प्रा.झोळ म्हणाले कि, या सवलतीचे पञ आम्ही करमाळा तहसिल कार्यालयात दिलेले आहे त्यांनी त्यांच्या कार्यालयांमार्फत अशा पालकत्व गमावलेल्या अनाथ विद्यार्थ्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक देऊन तसा संबंधित दाखला द्यावा व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे आपल्या कार्यालयाकडुन लवकरात लवकर देऊन अशा अनाथ मुलांना व पालकांना सहकार्य करावे अशी मागणी केली आहे.
