आमसभेतील प्रश्नाची लेखी उत्तरे नागरींकांना द्यावीत – संजय (बापु) घोलप

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याची 2024/25 ची आमसभा 30 जुन रोजी झालेली त्या मध्ये विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे द्यावीत अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप यांनी आमसभा सचिव यांना करत आहेत.
बरेच प्रश्न लेखी व ईमेल द्यारे आमसभेचे सचिव गटविकास यांना पाठवण्यात आले होते. परंतु आमसभेतील वेळेअभावी बरेचसे प्रश्न उपस्थित झाले नाही त्यांना विचारण्याची संधी मिळाली नाही एक तर 10 वर्षानी आमसभा होते त्यामुळेच बरेच प्रश्न आले होते तरी त्या नागरींकांची निराशा झाली व आपले प्रश्न अनुत्तरित राहीले तरी आमसेचे सचिव यांनी आलेले प्रश्नांची प्रत्येक प्रश्नांना नगरीकांना लेखी उत्तर द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने करत आहोत.
एक महिना होऊन पण नागरीकांना लेखी उत्तरे मिळाली नाही ते आतुरतेने वाट पाहत आहेत लवकरात लवकर उत्तरे मिळावीत अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा संजय घोलप यांनी दिली आहे.


