करमाळा

शेलगाव क ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. रेश्मा राहुल कुकडे तर उपसरपंच पदी श्रीमती सुलोचना आप्पा जगताप यांची बिनविरोध निवड


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत शेलगाव क च्या सरपंच पदी सौ. रेश्मा राहुल कुकडे तर उपसरपंच पदी श्रीमती सुलोचना अप्पा जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सभेला ग्रामपंचायत सदस्य कविता सचिन वीर, यमुना आत्माराम वीर, धर्मराज गोपीनाथ शिंदे, अशोक मधुसूदन काटुळे, लक्ष्मण विश्वनाथ ढावरे आदी ग्रामपंचाय सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी आबासाहेब खाडे, ग्राम महसूल अधिकारी श्री खुडे भाऊसाहेब, मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री आर के वळेकर उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त सरपंच सौ. रेश्मा राहुल कुकडे बोलताना म्हणाल्या, येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचा विकास करणार आहोत.नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!