करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी दिवसा घरफोडीच्या गुन्हयातील १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी केली असुन दिवसा घरफोडीच्या गुन्हयातील १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत हकिकत अशी की दि. ०६/१२/२०२४ रोजी  अभिजीत जीवन सरडे, वयः २७ वर्षे, रा. कंदर, ता. करमाळा यांनी फिर्याद दिली  दुपारी १२:०० वा. ते दुपारी ०२:३० वा. चे दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे राहते घराच्या दरवाजाची कडी उचकटुन त्यांच्या घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम घरफोडी करून चोरुन नेली आहे. याबाबत  करामळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७८८/२०२४, भा. न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्हयाचा निरंतर तपास वालु आहे.सदर गुन्हयाच्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा आरोप रामेश्वर जंगल्या भोसले, वयः २५ वर्षे, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड याने केल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीला  अटक करुन मा. न्यायालयाकडुन त्याची पोलीस कोठडी रिमांड मंजुर करुन घेवुन त्याचेकडुन सदर गुन्हयात चोरी केलेल्या दागीन्यापैकी १,५०,०००/- रु. किंमीतीची सोन्याची कर्नफुले सोन्याची ठुशी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी याचेविरुध्द यापुर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं. ७८८/२०२४, भा.न्या. सं. कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे.२) कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. ७७५/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०९ (९), ३३१ (५) प्रमाणे.           ३) कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. ६७४/२०२४, भा. न्या. सं. कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे.                                                 ४) गंगापुर पोलीस ठाणे गु.र.नं. ४२५/२०१८, भा. द. वि.सं. कलम ३९९, ४०२ प्रमाणे.                                                          ५) बिडकीन पोलीस ठाणे गु.र.नं. ८१/२०२१, भा.द.वि.सं. कलम ३९४, ४११, ३४ प्रमाणे.६) कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. ३६०/२०२१, भा. द. वि. कलम ३८०, ४५७ प्रमाणे.७) राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ६९२/२०१६, भा.द. वि. कलम ३८०, ५११ प्रमाणे.८) आष्टी पोलीस ठाणे गु.र.नं. १८६/२०१५, भा.द.वि. कलम ३९४, २९९ प्रमाणे.सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो. करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक/रणजीत माने, म. सहा. पोलीस निरीक्षक गीरीजा म्हस्के, पो.उप. निरी. प्रशांत मदने, पो. हवा./१६४८ अजीत उबाळे, पो.ना./९१२ वैभव ठेंगल, पो.ना./११६२ मनिष पवार, पो.शि./८४३ सोमनाथ गावडे, पोकॉ/६८९ योगेश येवले, पोकॉ/१६७ मिलिंद दहिहांडे, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/१५२४ अमोल रंदिल, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे तसेच अंगुलीमुद्रा विभागाचे स.पो.नि./गळवे व पो.शि./ व्यंकटेश मोरे, नेमः सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!