कमलाई कारखान्यात अपघाती निधन झालेला युवकाच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत कारखान्याने द्यावी शिवसेनेची मागणी
करमाळा प्रतिनिधी कमलाई शुगर श्रीदेवीचा माळ येथील साखर कारखान्यावर इलेक्ट्रिकल विभागात काम करणाऱ्या गणेश नवनाथ खराडे राहणार बोरगाव या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू कारखान्यात झाला होता त्याच्या कुटुंबाला किमान कारखान्याचे चेअरमन विक्रम शिंदे यांनी दहा लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेची उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी कारखाना प्रशासनाकडे केली आहे. गणेश खराडे वय 31 हा कमलाई शुगर कारखान्यात इलेक्ट्रिकल विभागात काम करत असताना सात जून रोजी इलेक्ट्रिक विभागात कारखान्यात अपघात झाला यात खराडे 65 टक्के भाजला उपचारा घेताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या पाठीमागे 22 वर्षीय विधवा सोनल गणेश खराडे असून तिला पाच महिन्याचा मुलगा आहे आता त्यांना उपजीविकेचे कुठलेही साधन राहिलेले नाही अपघात झाल्यानंतर कारखान्याच्या वतीने खराडे याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्याचा खर्चही कारखान्याने केला पण दुर्दैवी अंत झालाया सगळ्या बाबींचा विचार करून या मयत कर्मचाऱ्यांची पत्नी व तिच्या पाच महिन्याचा मुलगा याच्या भविष्याचा विचार करून विक्रम शिंदे यांनी मनाचा मोठेपणा करून या दुर्दैवी कुटुंबाला दहा लाखाची मदत करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली आहे
