सेवापुर्तीनिमित्त स्वातीताई माने यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

करमाळा, प्रतिनिधी दि. १- करमाळा नगरपरिषदेतील ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत असलेल्या कैकाडी समाज संघटनेच्या महिला आघाडीच्या राज्य प्रदेश अध्यक्षा, एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेच्या उपाध्यक्षा स्वातीताई माने यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हॉटेल स्वराज येथे आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ह. भ. प. ऍड. बाबुराव हिरडे होते. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने, जेष्ठ नेते विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे – पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव जाधव, पत्रकार विवेक येवले, जेष्ठ नेते अमोद संचेती, माजी नगराध्यक्षा पुष्पा फंड, विद्या चिवटे, डॉ. रोहन जाधव – पाटील, सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी गोपाळराव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सेवा निवृत्ती निमित्ताने माने यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी समाजातील तळागाळातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी माने उभयंतानी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. भविष्यकाळात त्यांच्या सामाजिक कार्यात नेहमीच सहकार्य राहील. समाजाच्या हितासाठी केलेले कार्य स्मरणात राहणारे असते. असे मत जेष्ठ नेते विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी व्यक्त केले.यावेळी बोलताना ह. भ. प. ऍड. हिरडे यांनी, इतरांच्या हितासाठी परोपकारी वृत्तीने कार्यरत राहणारी जी मोजकी माणसं आहेत त्यामध्ये माने दांपत्याचा समावेश होतो. उपेक्षित, वंचित घटकाच्या उन्नतीसाठी त्यांचे असणारे कार्य प्रभावी आहे. असे सांगितले. तर करे – पाटील यांनी जीवनाच्या प्रवासात समाजातील गरजू घटकांना न्याय मिळवून देतानाच त्यांना आनंद देण्याचे कार्य बहुमोल आहे. असे स्पष्ट केले. याप्रसंगी येवले, प्रा. अर्जुन जाधव, स्वरूपचंद्र गायकवाड, डॉ. सुनीता दोशी, मंजिरी जोशी, माया भागवत, माजी नगरसेविका स्वाती फंड, सुहास ओहोळ, नंदकुमार जाधव, प्रियंका गायकवाड यांनी उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिनिधीनी माने दांपत्याचा सन्मान केला.
करमाळा नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी सचिन तपसे यांनीही सौ स्वातीताई माने व रामकृष्ण माने यांचा सपत्नीक सन्मान केला.तसेच यशकल्याणी संस्थेच्या वतीने यशकल्याणी समाजरत्न पुरस्कार देवून स्वातीताई माने यांना गौरविण्यात आले.सन्मान सोहळ्यानंतर बोलताना रामकृष्ण माने यांनी, सामाजिक कार्य करत असताना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. तर स्वातीताई माने यांनी, आपल्या सेवा काळात सातत्याने चांगली माणसं भेटत गेली, सेवा निवृत्ती निमित्ताने झालेला सन्मान आठवणीत राहील, आपल्या कार्यात कुटुंबाची मिळालेली साथ आणि पाठबळ याचा मोठा वाटा आहे. यापुढील काळात सामाजिक कार्यात अधिक जोमाने सक्रिय होणार आहे. असे स्पष्ट केले.सदर सन्मान सोहळ्यास पोलिस अधिकारी बिभीषण जाधव, डॉ. बाबुराव लावंड, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके, नरेंद्रसिंह ठाकूर, जयंत दळवी, आशपाक सय्यद, सचिन जव्हेरी, सचिन साखरे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती नाशिक शाखा करमाळा तालुका अध्यक्ष संतोषकाका कुलकर्णी, नाथाजीराव जाधव, अफसर जाधव, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे, नगरसेवक संजय सावंत, अतुल फंड, महादेव फंड, प्रशांत शहाणे, प्रवीण शहाणे, मा. पा. जाधव, बुवासाहेब फलफले, प्रा. अभिमन्यू माने, सेवानिवृत्त इंजिनियर तळेकर, पासंगराव, विजय देशपांडे, डॉ. कापडी, विनायक रासकर, प्रदीप वीर, प्रा. कल्याणराव साळुंखे, प्रा. बाळकृष्ण लावंड, कय्युम शेख, माजी नगरसेविका सुमित्राताई घोलप, राजश्री माने, बळीराम माने यांच्यासह क्षितिज ग्रुपच्या सदस्या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी, शहरवासीय, माने व जाधव परिवारातील सदस्य, मित्र परिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत क्रांतीताई माने यांनी केले. आभार ऍड. संग्राम दादा माने यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकलव्य परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


