करमाळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य खाऊचे वाटप करुन आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या भारत घुगीकर काकांचा उपक्रम स्तुत्य- संतोष काका कुलकर्णी*

* करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करून आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्याचा साडे येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुरोहित ‌ भारत घुगीकर काका़चा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत भाजप उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते ब्राह्मण समाजाचे मार्गदर्शक सदस्य भारत घुगीकर काका यांच्या वाढदिवसानिमित्त ‌ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला पंचायत समिती माजी उपसभापती ज्ञानदेव शेलार, ज्येष्ठ मार्गदर्शक हंबीरराव मस्कर, करमाळा भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती ‌ करमाळा शाखेचे तालुका प्रसिद्धीप्रमुख निलेश गंधेउपस्थित होते. यावेळी भारत घुगीकर यांच्या 67 वाढदिवसानिमित्त त्यांचा व त्यांच्या धर्मपत्नी ‌सौ मिना भारत घुगीकर सत्कार करण्यात आला.यानिम्मिताने साडे येथील प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना ‌ संतोष काका कुलकर्णी म्हणाले की ‌ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ‌ महाराष्ट्राचे विकास प्रिय नेतृत्व असून ‌ महाराष्ट्राला ‌ अग्रक्रमावर नेण्यासाठी त्यांची योगदान ‌ मोलाचे आहे. त्यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमात साजरा करण्याचे आवाहन भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना केले होते
त्याच अनुषंगाने भाजप उद्योग आघाडी ‌ करमाळा यांच्यावतीने देवेंद्र फडवणीस यांच्या ‌ वाढदिवसानिमित्त ‌ ज्येष्ठ कार्यकर्ते भारत घुगीकर यांनी ‌त्यांच्या वाढदिवसानिमित्त फेटा हार तुरे समारंभाला खर्च वायफळ न करता आपल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक ‌ साहित्याचे खाऊचे वाटप ‌ करून वाढदिवस साजरा केला आहे याचा आदर्श युवा कार्यकर्त्यांनी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळा साडे येथील सर्व शिक्षक विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!