करमाळा नगरपरिषद बारामती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने करमाळा शहरांमध्ये 12ऑगस्ट 2022 रोजी मोफत आरोग्य शिबिर
करमाळा प्रतिनिधी 15 ऑगस्ट,2022 स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्त करमाळा तालुक्याचे मा.आ.श्री जयवंतराव नामदेवराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपरिषद व बारामती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आपल्या करमाळा शहरांमध्ये 12ऑगस्ट 2022 मोफत आरोग्य शिबिर महात्मा गांधी विद्यालय & ज्युनिअर कॉलेज करमाळा येथे 10 ते 4 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्देश करमाळा शहर परिसरातील लोकांचे आरोग्य चांगले रहावे तसेच बारामती हॉस्पिटल मधील अद्यावत सेवा व यंत्रसामुग्रीची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा आहे.आरोग्य शिबिरामध्ये हृदय तपासणी, शुगर, ब्लड प्रेशर आणि गरज वाटल्यास ई.सी.जी. ची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.तरी करमाळा तालुका व शहरातील सर्व नागरिकांनी, ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
