कालकथित शांताबाई दिगंबर कांबळे यांचा “द्वितीय स्मृतीदिन मुकबधीर शाळेत अन्नदान करुन साजरा
करमाळा प्रतिनिधी कालकथित: शांताबाई दिगंबर कांबळे यांचा सोमवार: दिनांक: 24/02/2025 रोजी. दुपारी 1 वाजता “द्वितीय स्मृतीदिन कार्यक्रम” श्री.जगदंबा कमलाभवानी मुकबधीर निवासी विद्यालय – श्री. देविचामाळ, ता.करमाळा.जि.सोलापूर. या ठिकाणी संपन्न करण्यात आला.प्रथम: त्यांचा मुलगा : इले.इंजि.आद.एल.डी.कांबळे साहेब(लक्ष्मण दिगंबर कांबळे)आणि.सुन:वनिता लक्ष्मण कांबळे मॅडम तसेच मुलगी: आद.गोपिका कांतीलाल जगताप मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत तथागत: भगवान बुद्ध आणि मैत्रैय बुद्ध: अर्थात: प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप व धूप प्रज्वलित करून तसेच कालकथित: शांताबाई दिगंबर कांबळे यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, कांबळे परिवार आणि सर्व शिक्षक, कर्मचारी स्टाफ यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. आद.एल.डी कांबळे साहेबांनी इतर सर्व वायफट खर्चास फाटा देऊन अनावश्यक खर्च टाळुन जिथ गरज आहे तिथच योग्य ठिकाणीच हा खर्च करावा म्हणूनच कांबळे परिवाराने या “मुकबधीर शाळेत” स्मृतीदिन कार्यक्रम घेऊन सर्वांनाच फळे वाटप करून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.यावेळी दलित सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष: आद.लक्ष्मणराव भासले साहेब यांनी कालकथित: शांताबाई कांबळे यांच्या 96 वर्षाचा जिवन प्रवास या विषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, बौद्धाचार्य प्रशांत लिंबराज कांबळे यांनी सर्व बौद्ध पध्दतीने विधीवत कार्यक्रम पार पाडला आणि आद.एल.डी. कांबळे यांनी आणि त्यांच्या पत्नी आद.वनिता यांनी त्यांची चांगली सेवा केली.व ज्या काही त्यांच्या इच्छा होत्या त्या सर्व या जन्मातच पुर्ण केल्या आहेत. म्हणून तर त्या 96 वर्षापर्यंत समाधानकारक मंगलमय जिवन जगल्या आहेत आता कुठलेही दुख: करावयाचे नाही. अशी धम्मदेसना दिली. या स्मृतीदिन कार्यक्रमास:आद. एल.डी.कांबळे,आद.वनिता लक्ष्मण कांबळे,आद.गोपिका कांतीलाल जगताप मॅडम,आद. कांतीलाल जगताप साहेब, आद.वैशाली संतोष कांबळे,आद.रुपाली सुभाष भोसले,आद.डॉ.दिपाली संतोष गायकवाड, पल्लवी अतुल खरात, समायरा संतोष गायकवाड, अरुप अतुल खरात, तसेच, आद.लक्ष्मणराव भोसले,आद.भिमराव कांबळे सर,आद.सिद्धार्थ भोसले.तसेच सर्व मुकबधीर शाळेतील शिक्षक- शिक्षकेतर स्टाफ,विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शेवटी सरणंतय गाथा घेऊन सर्व उपस्थितांमधुन- कालकथित: शांताबाई दिगंबर कांबळे यांच्या पवित्र मंगलमय स्मृतीस त्रिवार विनम्र अभिवादन करून भावपूर्ण आदरयुक्त श्रद्धांजली वाहण्यात आली.
