कुकडीबाबत आमदार नारायण आबा पाटील यांनी दाखविली सतर्कता, प्रत्यक्षात पोंधवडी चारी क्षेत्रात जाऊन केली पाहणी.
करमाळा प्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील हे सध्या जमीन स्तरावर जाऊन विकासकामांची पाहणी करत आहेत. या तीन महिन्यांत कुकडीची दोन व दहिगाव उपसा सिंचन योजनेचे एक अशी तीन पाणी आवर्तने त्यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली. यातच त्यांनी कुकडी बाबत आता बारकाईने लक्ष दिले असल्याने अधिकारी वर्ग कामाला लागला आहे तर शेतकरी आपले प्रश्न प्रत्यक्षात आमदार महोदयांची भेट घेऊन मांडू लागला आहे. सध्या करमाळा तालुक्यासाठी कुकडीचे आवर्तन सुरू असून करमाळा तालुकाला पुरेशा दाबाने कुकडीचे पाणी मिळत नसल्याने शनिवार ता.1 रोजी आमदार नारायण पाटील यांनी उकडीच्या पोधवडी चारीची पाहणी केली.यावेळी उपविभागीय अभियंता राजगोपाळ साळुंखे ,कनिष्ठ अभियंता दीपक कईतके यांनी कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात आमदार नारायण पाटील यांना माहिती दिली. यावेळी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्याला साडेपाच ते पावणे सहा टीएमसी पाणी राखीव असून देखील करमाळा तालुक्याला पुरेशी पाणी मिळत नाही त्यामुळे योग्य नियोजन करून करमाळा तालुक्यातील कुकडीचे पाणी मिळाले पाहिजे असे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्यक्षात पाहणी करत असताना विविध गावचे पदाधिकारी तसेच सामान्य शेतकरी वाटेत भेटून आमदार नारायण आबा पाटील यांना निवेदन देताना पहावयास मिळाले.
यावेळी पोंधवडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे, जिच्यामामा हजारे, सोना गावडे ,रूपचंद गावडे, शहाजी हुलगे, लालासाहेब हुलगे ,आदिनाथ देवकते ,संजय चोपडे, धनंजय कोडलिंगे मोहन मारकड, प्रदीप हाके ,जगन्नाथ नाळे, मंगेश बंडगर ,यांच्यासह पोंधवडी, विहाळ,कोर्टी, हुलगेवाडी ,मोरवड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
