राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत अँजिओग्राफी व एन्जोप्लास्टी शिबिराचे बारामती येथे आयोजन- आशपाक जमादार जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रैंस
करमाळा प्रतिनिधी
बारामती येथील बारामती हॉस्पिटलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त अँजिओग्राफी व एन्जोप्लास्टी मोफत असून सदर शिबिर हे दिनांक 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत असून सदर शिबिराचा लाभ करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांनी घ्यावा अशी माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक(भाई)जमादार यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जमादार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त तसेच बारामती हॉस्पिटल यांच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सदरचा सामाजिक उपक्रम राबविला आहे सदर शिबिरामध्ये नामवंत डॉक्टर मोफत तपासणी करणार आहे यामध्ये डॉक्टर मेहुल ओसवाल,डॉक्टर राजीव खरे,डॉक्टर वरून देवकाते,डॉक्टर सनी शिंदे तसेच डॉक्टर केतन आंबेडकर हे नामवंत डॉक्टर यामध्ये मोफत एन्जोप्लास्टी व अंजॉग्रफी करणार आहे
सदर शिबिरामध्ये भाग घेऊन इच्छिणाऱ्या रुग्णांनी रेशन कार्ड व आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे इच्छुक रुग्णांनी 9075129998, 9175941125, 9075139998, 7020864313, 7755952008 सदर दिलेल्या मोबाईल नंबर वर इच्छुक रुग्णांनी आपली नोंदणी करावी.
सदर शिबिराचा लाभ करमाळा शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जमादार यांनी केले आहे.
