Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाराजकीय

गणेश चिवटे यांनी वीट जि. प. गटातून निवडणूक लढवावी – सचिन गायकवाड

 

करमाळा – भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी वीट जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केली आहे ,
सध्या करमाळा तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, यामध्ये प्रत्येक पक्ष व गट यांच्याकडे वेगवेगळे उमेदवार आपल्या उमेदवारीची मागणी करत आहेत ,अशा वेळी वीट जिल्हा परिषद गट हा करमाळा शहराच्या लगत असून या गटामध्ये भाजपासाठी अनुकूल वातावरण आहे ,गणेश चिवटे यांच्या सामाजिक व राजकीय कामाचा विचार करता ते या गटात प्रबळ दावेदार ठरू शकतात ,
आज पर्यंत त्यांनी शासनाच्या विविध योजना तसेच दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून या गटात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असे मत देवळालीचे युवा नेते सचिन गायकवाड यांनी व्यक्त केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group