Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

करमाळयात बोगस नोटरी करुन फसवणुक केल्याबद्दल तिघांचा जामिन फेटाळला

करमाळा प्रतिनिधी बोगस नोटरी दस्त करून महिला डॉक्टरांची जागा विकत घेतल्याचे सांगुन फसवणूक केल्या प्रकरणी करमाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील संशयीत हा फरार आहे. यातील संशयीताने अटकपुर्व जामीनाचा अर्ज बार्शी न्यायालयात केल्यानंतर तिघांचाही जामीन फेटाळला आहे. त्यामुळे यातील सशयीतांना आता ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. सोहेल अब्बास शेख असे संशयीताचे नाव आहे. सदरचा व्यक्ती दवाखान्यात कामाला आहे.
डॉ. वैशाली पंकज शहा या सध्या चाकण ता. खेड जिल्हा पुणे येथे त्यांचे सासरी राहण्यास आहे. त्यांचे चाकण येथेच क्लिनिक आहे. डॉ. शहा यांचे माहेर करमाळा आहे. इथे त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. डॉ. शहा यांचे वडील प्रकाश मेहता हे दिनांक १९९५ रोजी मयत झालेले आहेत. तसेच त्यांची आई सरोजिनी मेहता २०१६ रोजी मयत झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील २७१२/ब या जागेवर डॉ. शहा यांची वारस म्हणून नोंद लागलेली आहे.सदरची जागा ही दत्तपेठ करमाळा येथील मोक्याचे ठिकाणी असल्याने यातील संशयीत सोहेल अब्बास शेख डॉ. शहा या करमाळा येथे राहत नसल्याचा फायदा घेऊन बोगस नोटरी दस्त बनवला व सदर दस्तावर मुन्ना पत्तू शेख व तुषार मधुकर शिंदे यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या व यातील फिर्यादीस रक्कम रुपये दहा लाख रुपये दिल्याचे दाखवून साठेखत केल्याचे बोगस दस्त तयार केला. यातील फिर्यादीच्या बोगस सह्या करून त्या आधारे तहसीलदार यांच्याकडे प्रतिज्ञापत्र सादर करून फिर्यादीच्या सहमतीशिवाय वीज कनेक्शन ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला व सदरची बाब डॉ. शहा यांना समजल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्र हस्तगत करून करमाळा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला. यातील संशयीत आरोपींनी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन साठी धाव घेतली होती.
सदर जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांच्यासमोर झाली. जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी सरकारी वकील पी. ए. बोचरे व मूळ फिर्यादीचे वकील सुहास मोरे करमाळा यांनी बाजू मांडली. व त्यांनी युक्तीवादामध्ये आरोपींची पोलिसांमार्फत चौकशी होणे गरजेचे असल्याने सदरचा गुन्हा गंभीर आहे. तसेच ओरिजनल कागदपत्रे हस्तगत करणे जरुरीचे आहे. तरी सदर गुन्ह्याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे व यामध्ये आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करणे महत्त्वाचे आहे असा युक्तिवाद केला आहे.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सोहेल अब्बास शेख, मुन्ना फत्तु शेख, तुषार मधुकर शिंदे यांचा अटकपूर्वक जामीनाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group