शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी आमदार शहाजी बापू पाटील यांची निवड करण्याची उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची मागणी
श
करमाळा प्रतिनिधी
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी आमदार शहाजी बापू पाटील यांची नेमणूक करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.महेश चिवटे यांनी पाठवलेले निवेदनात म्हटले आहे की आमदार शहाजी बापू पाटील ते तळागाळातून पुढे आलेले नेतृत्व असून त्यांच्याकडे संघटना कौशल्य जबरदस्त आहे सर्वसामान्य शिवसैनिकाच्या अडीअडचणी सोडून मंत्रालय पातळीवर सर्वांना न्याय देण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील हे सक्षम पर्याय आहेत.सोलापूर जिल्ह्यातील अनेक मोठे नेते माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य अनेक साखर कारखान्याचे चेअरमन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक असून अशा लोकांना संघटित करून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून देण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात
आगामी काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आदी महत्त्वाच्या निवडणुका आहेत आमदार शहाजी बापू पाटील हे सर्वमान्य अजातशत्रू नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिक एकजुटीने काम करण्यास तयार असून शहाजी बापू संपर्कप्रमुख झाले तर येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भगवा सर्व संस्थांवर फडकेल
भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतेमंडळीची आमदार शहाजी बापू पाटील यांची मैत्रीचे संबंध आहेत
त्यांच्याकडे अप्रतिम वक्तृत्व शैली असून या माध्यमातून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार गावोगावी पोचविण्यात यशस्वी ठरतीलकाय झाडी ;काय डोंगर; काय हॉटेल; सगळं ओके !!!या डायलॉग ने संपूर्ण देशात परिचित झालेले आयडॉल आमदार शहाजी बापू सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आशेचा किरण निर्माण करणारे ठरले आहे.यामुळे तात्काळ सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून आमदार शहाजी बापू पाटील यांची नेमणूक करून नवीन सर्व जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहर प्रमुख यांच्या नेमणूक कराव्यात व शिवसेना मजबूत करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे
