कोर्टी जिल्हापरिषद गटासाठी बागल गटाकडुन सुधीर ज्ञानदेव चव्हाण यांना उमेदवारी देण्याची कोर्टी ग्रामस्थामधुन मागणी
कोर्टी प्रतिनिधी कोर्टी जिल्हापरिषद गटासाठी बागल गटाकडुन सुधीर ज्ञानदेव चव्हाण यांना उमेदवारी देण्याची बागल गटाचे सर्मथकातुन होत आहे.सुधीर ज्ञानदेव चव्हाण हे गेल्या तीस वर्षापासुन बागल गटाचे कट्ठर समर्थक असुन दोन वेळा जनतेतुन ग्रामपंचायत सदस्य एक वेळ बिनविरोध सदस्य म्हणुन काम केले आहे.मातंग समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी मेळावा भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना रेशनकार्ड काढुन देण्यापासुन घरकुल मिळवुन दिले आहे .सर्वसामान्य जनता तसेच वंचित घटकांना शासकीय सुविधा मिळवुन दिल्या असुन पंचायत समितीच्या माध्यमातुन शेती अवजारे यंत्रे आर्थिक दुबल लोकांना आत्मनिर्भर होण्यासाठी साहित्याचा लाभ मिळवुन दिला आहे.वाचनसंस्कृतीची चळवळ जपण्यासाठी दोन वाचनालय चालु केले आहे.सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असलेला आपल्या कामाचा हक्काचा माणुस म्हणुन बागल गटाच्या नेत्या सौ.रश्मी दिदी बागल, युवा नेते दिग्विजय बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांनी बागल गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिल्यास विजय निश्चित असुन युवा नेते अमोल झाकणे,आशिष गायकवाड कोर्टी ग्रामस्थ यांनी सुधीर चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली असुन पोधंवडी सावडी कुंभारगाव हुलगेवाडी कुस्करवाडी पोमलवाडी केत्तुर जिंती टाकळी गोरेवाडी या भागात त्यांचे नातेसंबध व दांडगा जनसंपर्क असल्याने विजयाची नक्की खात्री असल्याची ग्रामस्थामधुन चर्चा आहे.
