Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळा

हिवरवाडी येथे ” जल जीवन मिशन ” अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व ॲरो फिल्टर चे उद्घघाटन

करमाळा  प्रतिनिधी
मौजे -हिवरवाडी ता.करमाळा येथे ” जल जीवन मिशन ” अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व ॲरो फिल्टर चे उद्घघाटन विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते व जेष्ठ नेते माजी आमदार मा.जयवंतराव भाऊ जगताप यांचे अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट रोजी संपन्न झाला.

या पाणीपुरवठा योजनेसाठी 53 लाख रुपये निधी मंजूर असून या निधीमधून साडेतीन किलोमीटर ची पाईपलाईन, विहीर खोलीकरण, नवीन टाकी बांधकाम व गावांतर्गत नव्याने पाईपलाईन करणे , नळ कनेक्शन देणे ई कामे केली जाणार आहेत.
यावेळी संतोष वारे , एड. राहुल सावंत,सुजित बागल यांनी मनोगत व्यक्त करून हीवरवाडीच्या समस्या सोडवणे संदर्भात आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे मागणी केली. आमदार संजयमामा शिंदे यांनी हिवरवाडी व या भागातील रस्ते विकासासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 4 कोटी निधी मंजूर केलेला असून पाणीपुरवठा योजनेसाठीही निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली. तसेच भविष्यकाळात आपल्या मागणीनुसार कामांची पूर्तता निश्चितपणे केली जाईल असे आश्वस्त केले. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कुणाच्याही दहशतीखाली न राहता हिवरवाडी ग्रामस्थांनी कणखर भूमिका घेऊन विकासाच्या पाठीमागे उभे राहावे व आमदार संजय मामा शिंदे यांना साथ द्यावी असे आवाहन केले.
यावेळी हिवरवाडी गावचे जेष्ठ नागरिक मा.राम इवरे सर, माजी जि.प.सदस्य,मा.संतोष वारे, माजी या.पं.सदस्य, ॲड.राहुल सावंत, माजी जि.प.सदस्य,मा.उध्दवदादा माळी,मा.सुजीततात्या बागल,रावगांवचे सरपंच मा.दादासाहेब जाधव,भोसे गावचे सरपंच मा.भोजराज सुरवसे, वडगांव चे सरपंच मा.लहू काळे, उपसरपंच मा.संभाजी गुळवे, प्रगतशील बागायतदार मा.जिजाबा इरकर, माजी सरपंच मा.दत्ता अडसूळ,मा. कैलास पवार,मा.दत्तू पवार,मा.नंदू इरकर,प्रा.भालचंद्र इवरे सर,मा.सोपान पवार,मा.अशोक पवार,मा.पिंटू पवार,मा.ज्ञानदेव खोमणे,मा.बापू पवार,मा.चिमाजी पवार,मा.नानसाहेब गुळवे,मा.चर्तूभूज इरकर,कामाचे ठेकेदार मा.कुलकर्णी व कार्यक्रमाचे आयोजक मा.सोनू चिवटे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group