करमाळा ते सातारा एसटी बस सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेची मागणी आगारप्रमुखाना दिले निवेदन
करमाळा प्रतिनिधी करमाळा ते सातारा (बारामती मार्गे) बस बंद होती बारामती येथे करमाळा तालुक्यातील असंख्य विदयार्थी शिक्षणासाठी आहेत. काही विद्यार्थांना त्यांचे पालक हे याच बस ने सकाळी दोन वेळेचा डबा पाठवत असतात, पण आत्ता काही दिवसांपासून ही बससेवा बंद होती. बारामतीत सतत ये – जा करणाऱ्या प्रवाशांना देखील याचा त्रास होत होता म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा शहर च्या वतीन अगारा प्रमुख सौ. अश्विनी किर्दाक मॅडम यांना ही बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी सौ.अश्विनी किरदक मॅडम यांनी सोमवार पासुन सुरळीत बस सुरू करण्याचे आश्वासन दिले . यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहरअध्यक्ष ऋषिकेश शिगची, उपाध्यक्ष आरशान पठाण, रामेश्वर भरते, ई. कार्यकर्ते उपस्थित होते
