करमाळा

३१ मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती प्रत्येक गावागावात साजरी करावी.– सौ. लक्ष्मी सरवदे


करमाळा प्रतिनिधी सालाबादप्रमाणे प्रमाणे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती ३१ मे ला प्रत्येक गावा,गावात साजरी करावी या मुळे समाजात जनजागृती निर्माण होईल,समाजात त्या निमित्याने एकता तयार होईल,समाजाला, व इतर समाज बांधवांना आपल्या मातेचा इतिहास माहीत होईल, *आणि समाजाला आपला इतिहास माहीत होईल, समाज आपल्या महापुरूषांचा इतिहास वाचतो तोच समाज इतिहास घडवतो हे नेहमी लक्षात ठेवा,आणि जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास बनवू शकत नाही, या जगात सर्वात मोठा,आणि सुंदर असा इतिहास असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आहे* संपूर्ण जगात पुण्यश्लोक अहिल्यादेवींकडे आदराने पाहिले जाते, *देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली* म्हणून त्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करायला हवी, गावातील सर्व समाज बांधवांना एकत्रित करायचे आणि त्याच गावातील जेष्ठ समाज बांधवान कडून अहिल्या देवीच्या फोटोंचे पूजन करून,तेथील समाज बांधवांना मार्गदर्शन करावे,शक्य असेल तर त्या कार्यक्रमाला इतर समाज बांधवांना सुध्दा बोलवावे,त्या मुळे इतर समाज बांधवांना सुध्दा अहिल्या देवींचा इतिहास माहीत होईल,आणि अहिल्या देवींना एका समाजा पुरते मर्यादित ठेवू नका, त्यांची कीर्ती महान आहे,म्हणून आपण आता आपल्या मातेची जयंती साजरी करत असताना इतर समाज बांधवांना सुध्दा सोबत घेऊन करा,राबवा हा उपक्रम गाव तिथे अहिल्या देवी जयंती साजरी करणार,लागा मग,आपल्या मातेच्या जयंतीच्या कामाला,जो सोबत येईल त्याला सोबत घेऊन काम करा,जो सोबत नसेल त्याला सुध्दा सोबत घेण्याचा प्रयत्न करा,सर्व हेवें दावे विसरून एकत्रित येऊन आपल्या मातेची जयंती साजरी करा,जय मल्हार , जय अहिल्या देवी जय क्रांती,परिवर्तन हमारा नारा है सारा समाज हमारा है, असे आवाहन माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे ‌‌.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group