करमाळा

शेतकरी सभासदांना विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारची देणी न देता मकाईची साखर परस्पर विक्री केली असल्याने सभासदांचे पैसे कोठून देणार प्रा. रामदास झोळ यांचा बागल गटास सवाल

करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची उत्पादित साखर परस्पर विक्री करून सभासदाची मागील चालु अद्यापही देणी न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम बागल गटाने केले असून परस्पर साखर विक्रीमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे ,शेतकरी संघटनेचे सुदर्शन शेळके ,तानाजी देशमुख उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही आजपर्यंत आम्ही तुम्हाला वारंवार सांगत होतो की मकाई कारखाना यांच्या चुकीच्या कारभारामुळे अडचणीत आहे. सभासदाची देणी देण्याकडेही यांच्याकडे एक पैसा नाही साखरेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असण्याची शक्यता आम्ही व्यक्त केली होती. ती शक्यता सभासदाच्या दृष्टीने खोटी ठरावी असे आम्हाला वाटत होते. परंतु दुर्दैवाने ती खरी ठरली असून मकाई साखर कारखान्याचे दिड लाख गाळप होऊनही गोडावुनमध्ये फक्त अडीच लाखाची साखर शिल्लक आहे.शेतकरी कामगार ऊस वाहतुकदार यांचे २६ कोटी ३२ लाख १८ हजार रूपये देणे असुन १५% व्याज देणे बाकी आहे.कारखान्याच्याबाबतीत २०२२- २३ मधील एफआरपी थकवल्याप्रकरणी कारखान्यावर बोजा चढवण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. याबाबत कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची यादी लेखापरीक्षक वर्ग १ यांच्याकडून सादर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकार्यांना प्रादेशीक सहसंचालक पांडुरंग साठे यांनी पत्र दिले आहे, .
, शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. २६ कोटी ३२ लाख १८ हजार तसेच त्यावरील व्याज देणे आवश्यक आहे.एफारपी थकवल्यामुळे तत्कालीन संचालक मंडळाच्या मालमत्तेवर बोजा चढवला जाणार आहे. याची यादी द्वितीय विशेष लेखापरीक्षक बी. यू. भोसले यांनी प्रादेशिक सहसंचालक यांना माहिती दिली आहे, असेही प्रा. झोळ यांनी म्हटले आहे. कामगारांची देणी दिली नाहीत साखर शिल्लक नाही, शेतकऱ्याची देणी दिली नसल्यामुळे. यावर लेखापरिक्षकांनी ताषोरे ओढले आहेत. . प्रादेशिक साखर सहसंचालक याबाबत ऊस पुरवठाची यादी दिलेली नाही कारखान्याची पुर्ण माहिती दिली आहे.शेअर्स तपशील दिला नाही कारखान्याचे आर आर सीमुल्य कमी असल्याने स्थावर तसेच संचालकाच्या मालमत्तेवर नोंद होणार आहे.साखर विकली बॅगस माॅलीसैस शिल्लक नाही शेतकऱ्याचे दैणी कुठुन देणार आजी माजी आमदार याबददल बोलण्यास तयार नाही. ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार यांना बरोबर घेऊन‌ साखर आयुक्त पुणे येथे आंदोलन करणार असल्याचे प्रा.रामदास झोळ यांनी सांगितले.आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहे.बिल कोठुन देणार हे त्यांनी दाखवले तर बिल कुठुन देणार आहात हा माल कोठे गेला हे दाखवावे लागणार आहे.ॲाडिटरने संबधीत अहवाल दिला आहे.तत्कालिक संचालक मंडळावर कारवाई करण्यात यावी. शेतकरी बांधवासह सर्व समविचारी लोकांना संघटनाना एकत्र करून लवकरच आंदोलन करणार असल्याचे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group