पुरातन काळातील भाविकांचे श्रद्धास्थान केतूरचे श्री किर्तेश्वर मंदिर.
केतुर नं 1 तालुका करमाळा येथील उजनी जलाशयाच्या काठावरती वसलेले किर्तेश्वर मंदिर हे या भागातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार, महाशिवरात्री आणि दर सोमवारी या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आणि विविध भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे जसे खिचडी, केळी इत्यादी उपवासांच्या पदार्थांचे वाटप केले जाते. तसेच मंदिरात अभिषेक, पूजा , आरती , ग्रंथ पारायण , भजन तसेच शेवटच्या सोमवारी किर्तन आदि धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. पहाटेपासूनच या पुरातन काळातील मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. उजनी जलाशयाच्या अगदी काठावर असलेले हे मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने ही महत्त्वाचे आहे. संपूर्ण मंदिर दगडी बांधकामात असून मोठ्या शिळांवर ते उभे राहिले आहे. केत्तूर नंबर दोन येथून हे मंदिर चार किलोमीटरच्या अंतरावर असून केतुर एक या गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे.
