दुसऱ्याचे जीवन समृद्ध करण्यासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व घुमरे सर – साहित्यिक डॉ.राजेंद्र दास
करमाळा प्रतिनिधी विलासराव घुमरे सर म्हणजे प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शुन्यातून विश्र्व निर्माण करून यशस्वी जीवन कसे जगावे यांचे उत्तम उदाहरण असुन युवापिढीने त्यांचा आदर्श घेऊन जीवनात यशस्वीपणे वाटचाल करावी असे मत जेष्ठ साहित्यिक डॉ राजेंद्र दास सर यांनी व्यक्त केले. विद्या विकास मंडळांचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक ६ / २ / २०२१ रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावियालयांचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील हे होते. या शिबीरांचे उद्घाटन आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर,मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, डॉ. सौरभ शिंदे , डॉ . हर्षद माळवदकर ,उद्योजक अँड.विक्रांत घुमरे , आशुतोष घुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी महाविद्यालयातील एन सी सी, एन एस एस च्या विद्यार्थ्यानी व यशवंत परिवारातील ६६ सदस्यानी रक्तदान केले . या कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा.प्रमोद शेटे यांनी केले . त्यानंतर सकाळी १० वाजता महाविद्यालयांच्या पाठीमागील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले . या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजीराजे किर्दाक सर हे होते . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले .वृक्षारोपणासाठी एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थीनी परिश्रम घेतले . त्यानंतर सकाळी ११ वाजता महाविद्यालयात प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र दास व प्रसिद्ध कवी माजी प्राचार्य डॉ . सुरेश शिंदे यांचे व्याख्यानआयोजित केले होते . या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत हे होते . या कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा. प्रदिप मोहिते यांनी केले . तर सुत्रसंचालन प्रा.विष्णू शिंदे व प्रा. मुक्ता काटवटे यांनी केले . यावेळी प्रा . लक्ष्मण राख यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयातील सरांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधाचा आढावा घेतला . प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील यांनी अनेक व्यक्तीच्या जडणघडणीत घुमरे सराचा सिंहाचा वाटा जाणवल्याचे स्पष्ट केले. साहित्यिक डॉ. दास सरांनी आपल्या मनोगतामध्ये विलासराव घुमरे सर म्हणजे अनेकजनांच्या जीवन समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व आहे. तुम्ही तुमच्या जीवनात अस्या लोकांशी मैत्री करा की ते घुमरे सरांसारखे तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील असे सांगितले . तसेच कवी डॉ. सुरेश शिंदे म्हणाले, की सतत संघर्ष करणारे व सतत दुसऱ्यांना मदत करणारे असे घुमरे सर आहेत .या आधुनिक युगात विज्ञानाच्या वाटेने जावा, पण साहित्याचा अभ्यास जरूर करा कारण साहित्यातून माणूस घडतो त्यांनी मनोगतातून सांगितले. वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले तसेच श्रीराम प्रतिष्ठान, करमाळा यांच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या अन्नपुर्णा योजनेतील अनाथ लोकांना यशवंत परिवाराच्या वतीने उद्योजक ॲड विक्रांत घुमरे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले .या कार्यक्रमाचे आभार प्रा. सौ. सुरेखा जाधव यांनी मानले .
