श्री कमलादेवी आॅप्टीकल्स करमाळा व आनंदत्रषी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
करमाळा प्रतिनिधी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन काम करणारे कमलादेवी आॅप्टीकल्सचे मालक सुरेश काका चाळक यांचे करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते स्व. बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी व्यक्त केले. श्री कमलादेवी आॅप्टीकल्स करमाळा व आनंदत्रषी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दत्तपेठ करमाळा येथे संप्पन झाले यावेळी ते बोलत होते. या शिबिरामध्ये 89 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 38 रुग्णांचे अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घघाटन स्व. बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गायकवाड जनतेचे नगरसेवक महादेव आण्णा फंड यांच्या हस्ते संपन्न झाले. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हे शिबिर आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी कमलादेवी आॅप्टीकल्सचे मालक सुरेश चाळक, रामानंद चाळक, सुरेश इंदुरे,रमेश शिंगाडे, शेखर इंदुरे पत्रकार दिनेश मडके उपस्थित होते.
