करमाळा शहरात आज तीन रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह कोरोना रुग्णांची संख्या एकूण पंचवीस

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात शनिवार दिनांक 18 जुलै रोजी एकूण 101 जणांची तपासणी ॲन्टीजीन रॅपीड टेस्टींग कीट द्वारे करण्यात आली. त्यापैकी एकूण 03 कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले.ते सर्व पुरुष असून शहरातील आहेत. त्यामुळे करमाळा शहरातील कॉविड 19 बाधित ची संख्या एकूण 25 (सरकारी दवाखाना व खाजगी तपासणी दोन्ही मिळून)इतकी झाली आहे. तसेच करमाळा शहरातील एका व्यक्तीचा बार्शी शहरात उपचार घेत असताना covid19 चा संसर्ग व पूर्वीचे मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे आज पहाटे मृत्यू झाला आहे. अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी. रॅपिड अँटिजेन test ची संख्या तालुक्यात वाढविण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी.मास्क सॅनिटायझरचा वापर करा.आपले हात वारंवार स्वच्छा धुवा असे आवाहन करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

