सामाजिक बांधिलकी जपणारे वैशिष्ट्यपूर्ण अशी राजकीय नेतृत्व गणेश चिवटे- डॉक्टर सुनिता दोशी
करमाळा प्रतिनिधी – गणेशजी चिवटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम प्रतिष्ठानने संपन्न केलेल्या सामुदायिकविवाह सोहळ्याच्या यशाबद्दल मा. गणेशजी चिवटे यांचा क्षितिज ग्रुप तर्फे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .
“वैष्णव जन तो तेणे कहिये
जो पीड पराई जाने रे… !”
या उक्तीप्रमाणे समाजातील भुकेले, निराधार वृद्ध, संघर्ष करत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या डब्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न सोडवत सामाजिक बांधिलकी जपणारे एक वैशिष्ट्यपूर्ण असे राजकीय नेतृत्व म्हणजे मा गणेशजी चिवटे होय…”असे मत क्षितिज ग्रुपच्या डॉ सुनीता दोशी यांनी व्यक्त केले…सामुदायिक विवाह थाटामाटात आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणणे ही खूपच आव्हानात्मक गोष्ट होती, एक देखणा विवाह सोहळा संपन्न करून समाजापुढे श्रीराम प्रतिष्ठानने समाजापुढे आदर्श असे उदाहरण घालून दिले आहे.अशा भावना सर्व क्षितिजगृपच्या सदस्यांनी व्यक्त केल्या. एवढे मोठे शिवधनुष्य अतिशय लीलया पेलणाऱ्या मा गणेश चिवटे आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे क्षितिज ग्रुपच्या सदस्यांनी अभिनंदन केले. नेत्रदान ,करमाळा शहरातले प्रश्न यावर चर्चा झाली .या चर्चेत नलिनी जाधव, माधुरी साखरे, पुष्पा फंड,मंजू देवी,सुप्रिया येवले, उज्वला देवी, कावेरी देशमुख, स्वाती माने, माधुरी परदेशी यांनी भाग घेतला.श्रीराम प्रतिष्ठाच्या भावी कार्यास क्षितिज ग्रुपने शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य विलास आबा जाधव, काकासाहेब सरडे, मोहन शिंदे, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, भीष्माचार्य चांदणे सर, गजराज चिवटे, संग्रामसिंह परदेशी, जगदीश भिंगारे, प्रमोद फंड, अमोल पवार, आजिनाथ सुरवसे, दिलीप पाटील, संजय किरवे, महादेव गोसावी आदिजन उपस्थित होते ,
