आमदार आपल्या गावी या उपक्रमाचे फलित काय तर लोकांमध्ये वाडयावस्त्यावर जाऊन त्यांच्या मूळ प्रश्नांना जाणुन घेऊन हे प्रश्न सोडवण्याचे वेगळे समाधान- आमदार संजयमामा शिंदे
*आमदार आपल्या गावी या उपक्रमाचे फलित काय* ?आमदार आपल्या गावी*…गावच्या विकासावर चर्चा व्हावी*…हा आगळावेगळा उपक्रम आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा आणि माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये 8 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये राबविला*..
*आ.शिंदे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्ती वरती जाऊन प्रत्यक्ष लोकांचे प्रश्न ,अडीअडचणी समजून घेतल्या. या दौऱ्याची सुरुवात सकाळी 8 वाजता व्हायची व समारोप रात्री 9 पर्यंत व्हायचा . या गाव भेट दौऱ्यात कुठेही डामडौल नव्हता*… *ना मंडप ,ना स्पीकर, ना खुर्च्या, ना टेबल , ना हार ,ना सत्कार* …*काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी अट्टाहास जरी केला तरी खुर्ची बाजूला सारून मामा खाली बसायचे*… *लोकात मिसळायचे*… *अडीअडचणी समजून घ्यायचे*… *आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना समजेल अशा पद्धतीने त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना द्यायचे*…. *हे लोकांमध्ये मिसळणं म्हणजे फक्त भावनिक राजकारण नव्हतं तर प्रश्नाच्या मुळाशी जाऊन प्रत्यक्ष प्रश्न समजून घेणं होतं .कार्यालयात बसून गावातील अडचणी समजून घेण्यापेक्षा ( विशेषतः रस्त्याच्या खूप अडचणी आहेत*… *घरतवडी गाव विकायला निघाले म्हणून लोकप्रतिनिधीवर टीका टिप्पणी झाली असली तरी असी अनेक गावे आहेत*… *वाड्या – वस्त्या आहेत की त्यांनी आजही गाव विकायला काढले* … *म्हणून सोशल मीडिया वरती पोस्ट केली तर गैर वाटायला नको एवढी रस्त्याची भयाण अवस्था ग्रामीण भागामध्ये आजही आहे*… *घरतवाडी हे एक फक्त उदाहरण आहे. कावळवाडी, भिलारवाडी, कुस्करवाडी ,गोरेवाडी, राखवाडी, लिंबेवाडी, रिटेवाडी, निलज किती गावे ? आणि किती प्रश्न* ?)* *रस्त्यांची ही भयान परिस्थिती प्रत्यक्ष पाहता आली. खडी उधडलेल्या रस्त्यावरून धुरळा उडवत,वेडी वाकडी वळण घेत वाडी वस्तीवर जाणं*… *एखाद्या वाडी वस्तीवर तर अद्याप साधं मुरूमीकरणही नाही अशा काळवटीच्या रस्त्याने जाणे आणि प्रत्यक्ष पावसाळ्यात लोक ह्या रस्त्याने कसे जात असतील हे प्रत्यक्ष मामांनी पाहिलं, अनुभवलं आणि त्यानुसार कामाची पुढची दिशा ठरवली*…
*त्यानुसार प्लॅनमध्ये नसलेले निकडीचे *रस्ते* *कोणते ? प्लॅनमध्ये असलेले निकडीचे रस्ते कोणते? याच्या याद्या करता आल्या* ..
*बॅकवॉटर* हा तसा समृद्ध भाग परंतु रस्ता, गावांतर्गत गटारी, स्मशानभूमी अशा पुनर्वसीत गावात खूप समस्या आहेत*…
*बॅकवॉटर ची गावं तशी श्रीमंत पण* *सार्वजनिक कामांच्या बाबतीमध्ये मात्र खूप गरीबच*…
*अशा पुनर्वशीत गावांचे प्रश्न खूप जवळून पाहता आले*… *पुनर्वसन विभागाकडून ज्या सुविधा गावांना मिळत असतात त्या पैकी 5 ते 6 सुविधा अद्याप काही गावांना दिल्या गेलेल्याच नाहीत*… *भूसंपादनाचे / पर्यायी जमिनीचे प्रश्न उत्तर खूपच वेगळे*…
*काही गावे डार्क शेड भूजल सर्वेनुसार निर्बंध लादलेली* … *त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही अशा गावांचे प्रश्नही लक्षात आले*
*आधी पुनर्वसन*
*मगच धरण* *हे सूत्र कधीच बासनात गुंडाळून ठेवल्यामुळे पुनर्वसित लोकांचे गंभीर प्रश्न पाहता आले*.
*रस्त्याची रुंदी कमी हा बॅक कॉटर कडे एक जिवंत आणि ज्वलंत प्रश्न .खरंतर रस्त्याची रुंदी कमी नसतेच मग तो ग्रामीण मार्ग असो इतर जिल्हा मार्ग असो की प्रमुख जिल्हा मार्ग असो. प्रत्येक रस्त्याची रुंदी ही ठरलेली असते, परंतु लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे अतिशय लहान रस्ते हा गंभीर प्रश्न बॅकवॉटर भागांमध्ये रस्त्यांचा बनलेला आहे. एका वेळेस एकच चारचाकी वाहन रस्त्याने जाऊ शकेल एवढे अरुंद रस्ते सध्या आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण या रस्त्यावर वाढलेलं आहे. भविष्य काळामध्ये हा प्रश्न रौद्ररूप धारण करू शकतो त्यामुळे सामंजस्याने लोकांनीच रस्ते आणि त्याच्या साईट पट्ट्या आणि गटरी व्यवस्थित सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे .रस्त्याच्या गटारी वरती अतिक्रमण केल्यामुळे ते पाणी शेतात घुसणे आणि शेताचे नुकसान होणे अश्याही तक्रारी लोकांच्या येत आहेत*.
*सवयीप्रमाणे लोकांकडून सभामंडप, हायमास , रस्ते याच मागण्या येत असतात. शाळा, अंगणवाडी ,क्रीडांगण, व्यायाम शाळा या मागण्या लोकांकडून येतच नाहीत* …*आमदार संजयमामा स्वतः या संदर्भात विचारणा करायचे पटसंख्या किती ? पट संख्येनुसार शिक्षक आहेत का ? वर्ग खोल्यांची काय परिस्थिती आहे ? दुरुस्ती करण्यासारखी आहे की नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे ? असेल तर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का? केले नसेल तर ते करून घ्या*… *अंगणवाडीसाठी सेविका आणि मदतनीस आहेत का? इमारत आहे का? गावामध्ये तालीम ,व्यायामशाळा आहे का ? नसेल तर त्याचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडे जमा करा . गावातील आरोग्य उपकेंद्राची काय परिस्थिती आहे ? पुरेसा स्टाफ आहे का ? औषधांचा पुरवठा नियमित होत असतो का* ?…*असे अनेक प्रश्न या गावभेट दौऱ्यामध्ये आ. संजयमामांना पाहता आले*. …*अनुभवता आले*… *सोडवता आले*… *खरंतर याची तटस्थपणे चर्चा व्हायलाच हवी* …
*अनेक गावांमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून एसटी बसची सोय नाही*… *त्यामध्ये म्हसेवाडी असेल, रीटेवाडी असेल , गुलमोहरवाडी, भगतवाडी असेल*… *या संदर्भात एसटी महामंडळाकडे आमदार साहेबांना मागणी करता आली. विकास ही एक चिरंतन आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एक विकासाचे काम होते त्यावेळेस ते दुसरा प्रश्न वाढवून ठेवते* … *कोर्टी ते आवाटी व सालसे ते यावली या दोन रस्त्यांची कामे खूप चांगल्या पद्धतीने झाली आणि त्याचा वापरही सुरू झाला. परंतु रस्त्याची कामे चांगली झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला त्यामुळे अपघातांचे धोके वाढले*… *वीट ,कोर्टी, रोशेवाडी, पांडे, सालसे, वरकुटे या गावातील नागरिकांकडून गतिरोधक बसवण्याची मागणी ही पुढे आली*… *त्या संदर्भातही पाठपुरावा करता आला*…
*अनेक गावांमध्ये वर्षानुवर्ष एम. एस. ई .बी कडून मेंटेनन्स ची कामे झालेली नाही त्यामुळे पोलच्या तारा वितळणे, स्पार्किंग होणे, शॉर्ट सर्किट होणे त्यातून अपघात घडणे हे प्रश्नही लक्षात आले .त्यानुसार महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना मेंटेनन्सच्या कामासंदर्भात सूचना करता आल्या*… *तालुक्यात चांगला पाऊस काळामुळे व नियमित चालणाऱ्या दहिगाव उपसा सिंचन योजनेमुळे पाणी आले ,परंतु विजेची अडचण निर्माण झाली. त्यासाठी आवाटी, राजुरी, रायगाव येथे नवीन सबस्टेशन व पांडे ,कोर्टी, कात्रज, कविटगाव ,कोळगाव ,दहिवली पिंपळनेर ,कव्हे, मैहृसगाव या जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढ या बाबी वरती कसे काम चालू आहे याची मांडणी लोकांना सांगता आली*.
*मांगी मध्यम प्रकल्पाचे उजवा आणि डावा असे दोन कॅनॉल आहेत. त्यापैकी गेल्या अनेक वर्षापासून बिटरगाव श्री या गावाच्या कॅनॉलच्या कामाचा प्रश्न अधांतरीत लटकलेला आहे. त्या संदर्भातही बैठक घेऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करता आला. महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली गेली*.
*तालुक्यातील जवळपास 95 टक्के गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामे मंजूर आहेत,परंतु अनेक गावामध्ये 3 – 4 वाड्या वस्त्यांचा समावेश सदर योजनेमध्ये झालेला नाही .त्यानुसार आमदार साहेबांना पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून थेट जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री व जिल्हाधिकारी सो यांचे समोर उर्वरित वाड्यावस्त्यांच्या समावेशाची मागणी करावी लागली आणि त्यानुसार राहिलेल्या वाडी वस्त्यांचा समावेश जलजीजीवन योजनेच्या प्रस्तावामध्ये करावा असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले*…
*दहिगाव उपसा सिंचन योजना ही करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असणारी योजना. या योजनेसाठी 1- 2 कोटी नव्हे तर तब्बल 101 कोटी रुपयाचे टेंडर मार्च 2023 मध्ये निघाले असून योजनेची उर्वरित सर्वच कामे बंदिस्त पाईपलाईन मधून होणार असल्यामुळे अगदी कमी कालावधीत योजना 100% क्षमतेने कशा पद्धतीने कार्यरत होणार आहे याविषयीची मांडणीही लोकांपर्यंत पोहोचवता आली .कुकडीचे पाणी हे करमाळा तालुक्यासाठी मृगजळ आहे. 24500 क्षेत्र ओलिताखाली या प्रकल्प अंतर्गत येणार असले तरीही अद्यापही साधी 2450 हेक्टर क्षेत्र ही बारमाही म्हणून ओलिताखाली आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे .त्यामुळे या कुकडी प्रकल्पासाठी 100 टक्के क्षमतेने प्रयत्न केले आणि 100 टक्के दाबाने पाणी जरी कुकडी प्रकल्पातून तालुक्यासाठी सोडले तरी 5.50 टीएमसी पैकी अर्धा टीएमसी सुद्धा पाणी आपल्याला मिळू शकणार नाही ही वस्तुस्थिती पाहिल्यानंतर सदर कुकडी प्रकल्पाचे पाणी उजनी धरणामध्ये सोडून कुकडी उजनी सिंचन योजनेच्या माध्यमातून 2 ठिकाणाहून हे पाणी उचलता येईल याबाबतचे काम सर्वे ,पत्रव्यवहार कसा केला गेला आहे हे लोकांपर्यंत पोहोचवता आले*…
*भगीरथ योजना ,सिंगल फेज , धिम लाईट ,सार्वजनिक शौचालय, मोबाईल टॉवर, रेशन कार्ड नसणे ,भूमिगत गटारीचा प्रश्न, सांडपाण्याची व्यवस्था नसणे, स्मशानभूमीची सोय नसणे ,अगदी लग्नासाठी मुली न मिळणे हे प्रश्न सुद्धा आमदारांसमोर मांडले गेले .त्याची कारणे शोधण्यात आली*
*ओढा खोलीकरण, बंधारे, वाचनालय, अभ्यासिका यांची मागणी येऊ लागली आहे*.
*रेल्वे बोगदा, रेल्वे थांबा आदी विषय*
*असं खूप काही फलित गाव भेट दौऱ्याचे निश्चितपणे सांगता येईल* …*येणाऱ्या काळात त्याचा प्रत्यय आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही*.
