Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासोलापूर जिल्हा

उजनी धरण भरल्याने धरणग्रस्त समितीच्या वतीने पाण्याचे पुजन खणा नारळानी ओटी भरुन आनंदोत्सव साजरा

करमाळा प्रतिनिधी– सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण काल शंभर टक्के भरले .याचा आनंद उजनी धरणग्रस्तांनी आज वाजत गाजत मोठ्या उत्साहात उजनीच्या पाण्याची खणा नारळानी ओटी भरून साजरा केला .ढोकरी ता करमाळा येथे उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती ने या कार्यक्रमाचे आयोजन केले .यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ,पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे, जि प सदस्या सौ सविता राजे भोसले, कार्यक्रमाचे संयोजक उजनी धरणग्रस्त धरणग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर, आदिनाथ चे अध्यक्ष धनंजय डोंगरे उपसभापती दत्ता सरडे, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, अजित दादा तळेकर, माजी उपाध्यक्ष शहाजी राव देशमुख, धुळा भाऊ कोकरे, आदि मान्यवरांच्या शुभहस्ते हा जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला .
या वेळी करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांचे हक्काचे पाणी विनासायास धरणग्रस्त व जलाशय काठावरील शेतकर्यांना मिळण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी प्रा. शिवाजीराव बंडगर यानी आपल्या प्रास्ताविकात केली .पुढे बोलताना ते म्हणाले की, सोलापूर शहराला यापुढे पाणी पुरवठा हा समांतर जलवाहिनी तून च करावा . त्यासाठी निधी मंजूर असलेल्या या योजनेचे काम विना विलंब पूर्ण करावे .जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे प्रा बंडगर यांचा प्रास्ताविकातील धागा पकडून म्हणाले की, भिमा नदी वाटे सोलापूर शहराला पाणी पुरवठा केल्याने वर्षभरात 25 टीएमसी उजनी तून सोडावे लागते . तेच पाणी समांतर जलवाहिनी तून नेल्यास अवघ्या अडीच टी एम सी पाण्यात सोलापूर शहराची तहान भागते .
त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी समांतर जलवाहिनी चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांचे कडेवर शासनाकडे पाठपुरावा करू .यावेळी संघर्ष समिती चे उपाध्यक्ष भारत साळुंके, महेंद्र पाटील, जिंती चे सरपंच पंचमराजे भोसले ,दत्ता बापू देशमुख, पोपट सातव,वांगी ग्रामपंचायत चे सदस्य रामेश्वर तळेकर, ज्ञानेश ढावरे, ज्ञानेश पवार,ढोकरी चे सरपंच महादेव वाघमोडे, पैलवान शिवा खरात, भाऊ खरात, अमर आरकिले, पांगरे ग्रामपंचायत चे सदस्य सचिन पिसाळ, माजी सरपंच विठोबा सलगर, बाळासाहेबा महानवर,माजी उपसरपंच कुंडलिक गडदे, गणेश खरात,पांडुरंग खरात, ग्रामपंचायत सदस्य बापूराव बोरकर, काकासाहेब बोरकर, नवनाथ वाघमोडे, भैया वाघमोडे, दत्ता वाघमोडे, शहाजी खरात, तुकाराम खरात,सूरज महानवर सखाराम वळसे,मामा सांगवे,बापू सांगवे, आबा सांगवे, बाबासाहेब चौगुले, गणेश घोरपडे,अजिनाथ देवकते,भागवत पाटील काशीनाथ होगले,सुहास कडाळे, खंडू कडाळे, आदी उपस्थित होते. उजनी धरणग्रस्तांचे व तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी विनासायास मिळवण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. पालकमंत्री, जिल्हा प्रशासन यांच्या कडे सतत पाठपुरावा करून समांतर जलवाहिनी चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. अनिरुद्ध कांबळे, जि प अध्यक्ष सोलापूर

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group