देवळाली खडकेवाडी ग्रामसभा उत्साहात संप्पन विविध कामास मंजुरी कै.कल्याणभाऊ गायकवाड प्रवेशद्वार उभारण्यात येणार-आशिष गायकवाड
करमाळा प्रतिनिधी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता देवळाली व खडकेवाडी ग्रामसभा आयोजित वेळेत पार पडली. या सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच आशिष गायकवाड हे होते व सभेचे प्रास्ताविक देवळाली गावचे ग्रामविकास अधिकारी श्री नागरसेसाहेब यांनी केले तसेच सभा सुरु होण्यापूर्वी अध्यक्ष तसेच देवळाली ग्रामपंचायत सरपंच आशीष कल्याण गायकवाड यांनी व ग्रामस्थांनी कोवीड काळात जे ग्रामस्थ मयत झाले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली.. त्या नंतर 15 व्या वित्त आयोगाच्या सन 2022/23 च्या आराखड्यास व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या सन 2021/22 व 2022/23 या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.. याशिवाय माझी वसुंधरा, ग्राम सुरक्षा यंत्रणा, विविध योजनेचे लाभार्थी निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत शेती विहीर लाभार्थी निवड, कै. कल्याण भाऊ गायकवाड यांच्या नावाने प्रवेश द्वार करण्यास मंजुरी. या प्रवेश द्वारा चा सर्व खर्च लोक वर्गणीतून करणार असल्याचे सरपंच आशीष कल्याण गायकवाड यांनी सभेत सर्व ग्रामस्थां समोर स्पष्ट केले ,15व्या वित्त आयोगातून झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली.. शौचालयाचा वापर न करणाऱ्या ग्रामस्थास दंडास पात्र असल्यास रु.1200/- दंड म्हणून फौजदारीचा गुन्हा दाखल केला जाईल असा ठराव मंजूर करण्यात आला.वन विभागाच्या डॉ.शामप्रसाद मुखर्जी ग्रामस्तरीय समितीस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून दिपक तानाजी साळुंखे व उपाध्यक्ष पदी पोपट विष्णू बोराडे यांच्यासहित एकूण 17 सदस्यांची निवड करण्यात आली. इतर सर्व विषयावर आणि ग्रामस्थ्यांच्या अडचणीवर चर्चा करून उपाय योजना तात्काळ करणेबाबत सकारात्मक चर्चा झाली.. या सभेसाठी सरपंच आशिष गायकवाड, उपसरपंच सौ.अश्विनीताई शिंदे, आशा रायकर,नर्मदा कानगुडे,मंदाकिनी कानगुडे, गहिनीनाथ गणेशकर,पोपट बोराडे,कल्याण शेळके,किसन चांदने,संगीता चौधरी,द्रौपदा कानगुडे,नाजूका राखुंडे, भास्कर कानगुडे, या ग्रामपंचायत सदस्यासह, ग्राम विकास अधिकारी, श्री नागरसे, तलाठी, कृषी सहाय्यक, वनपरीक्षेत्र अधिकारी,पोलिस कर्मचारी, शिक्षक व मोठया संख्येने देवळाली ग्रामस्थ उपस्थित होते, या दरम्यान मतदार यादीचे वाचन करून मयत, लग्न होऊन गेलेल्या महिला, नवीन मतदार नोंदणी यावर चर्चा झाली. आणि ग्राम सभेची सांगता होण्या अगोदर ग्राम विकास अधिकारी व देवळाली गावचे सरपंच आशिष कल्याण गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडली. व सभेची सांगता झाली.
