कुर्डुवाडी MIDC बद्दल सकारात्मक चर्चा. आ.संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
कुर्डूवाडी MIDC मधील उद्योगांना चालना देण्यासाठी मंत्रालयात उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या दालनामध्ये करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी आज भेट देऊन चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक स्वरुपाची झालेली असून एमआयडीसीमधील उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावरून योग्य ते निर्देश दिले जातील असे आश्वासन उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई यांनी आमदार शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे भविष्यकाळात कुर्डूवाडी एमआयडीसीला चांगले दिवस येतील अशी आशा आहे. यावेळी सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख धर्मवीर धनंजय डिकोळे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड, चोभे पिंपरी चे सरपंच विक्रम उरमोडे, कुर्डवाडी चे सोमनाथ गवळी उपस्थित होते.
