Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहोचतील घरोघरी हा उपक्रम शुक्रवारपासून राबविणार आमदार संजय मामा शिंदे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी
सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांना मिळाव्यात म्हणून ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. 26 तारखेला रावगाव गणातून याची सुरुवात होणार आहे, अशी माहिती करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार संजयमामा शिंंदे यांनी गुरुवारी (ता. 18) पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, डॉ. विकास वीर, राष्ट्रवादी युवकचे तुषार शिंदे, राजेंद्र बाबर, हिंगणीचे माजी सरपंच हनुमंत पाटील आदी उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, ‘कोरोना कालावधीमध्ये काम करण्यासाठी अनेक अडचणी होत्या. आता परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे.नागरिकांना आपल्या गावाजवळ सुविधा मिळाव्यात व शासकीय योजनांची माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे.शासकीय योजनांची माहिती नागरिकांनी देणे यासह आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना, मोतिबींदू तपासणी, एसटी बस पास, प्रधानमंत्री आवास योजना, श्रावणबाळ योजना, उज्ज्वला गॅस योजना, श्रम आदी योजनाची माहिती दिली जाणार आहे. यावेळी सुजित बागल म्हणाले, नागरिकांना गावातच योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केला जात आहे. 26 तारखेला रावगाव येथून या उपक्रमाची सुरुवात होत आहे.  डॉ.विकास वीर यांनी प्रास्ताविकात उपक्रमाबद्दल माहिती सांगितली. प्रत्येक गटात व गणात हा उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.                 रायगाव येथील शिबिरामध्ये वंजारवाडी, लिंबेवाडी, भोसे, पिंपळवाडी, मोरवड, पुनवर व वडगाव दक्षिण येथील नागरिकांनी उपस्थित रहावे व आपल्या अडचणी सोडवाव्यात असे आवाहन आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे व उपस्थितांच्या हस्ते आमदार आपल्या दारी या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group