रावगाव येथील तिरुपती बालाजी मंदिराचा रविवारी 21 नोव्हेंबर रोजी पायाभरणी समारंभ
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात तिरुपती बालाजीच्या धर्तीवर रावगाव येथे तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार असुन तिरुपती बालाजी मंदिराचा पायाभरणी होमहवन मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती बालाजी भक्त मंदिराचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी दिली आहे. 2017 सालापासून दरवर्षी रावगाव व शेजारील शाळांना शालेय साहित्याचे वाटप,रावगाव परिसरातील व तालुक्यातील नागरिकांना देवदर्शन यात्रा, कोरोना महामारीत आरोग्य तपासणी शिबिर, गोरगरिबांना दिवाळी फराळाचे वाटप,रावगाव येथील कोरोना सेंटरला आर्थिक मदत, हैदराबाद गोशाळा सेवा आदी सामाजिक उपक्रमानै समाजसेवेचे कार्य चालू आहे. दान करणे ही भारतीय समाजाची पंरपरा असुन विद्यार्थी, वानप्रस्थी,सन्यासी यांना जीवन व्यतीत करण्यासाठी संसाधन उपलब्ध करून देणे ,मंदिर तिर्थक्षेत्रातील धर्मशाळा इतर समाजपयोगी स्थानांचे निर्माण करणे सहयोग करणे हा समाजातील श्रीमंत लोकांचा स्थायीभाव राहिला असून सामाजिक कर्तव्य मानल जात आहे. याच पंरपंरेला मानुन येथील
श्री तिरुपती बालाजी मंदिर उभारणीच्या या कार्यात सकल समाजाने सात्त्विक दान करुन सहकार्य करावे तिरुपती बालाजी मंदिराच्या पायाभरणी समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन लक्ष्मण बुधवंत यांनी केले आहे.
