रावगाव येथील आमदार आपल्या दारी उपक्रमाचा 1500 जणांनी घेतला लाभ
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 26/ 11/ 2021 पासून आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी हा उपक्रम सुरू केला असून पहिल्याच रावगाव येथील शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या शिबिराचा लाभ 1500 नागरिकांनी घेतला आहे.
रावगाव येथील शिबिरामध्ये वडगाव दक्षिण, भोसे ,मोरवड ,लिंबेवाडी ,वंजारवाडी, येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. यामध्ये डिजिटल सातबारा उतारे -707, रेशन कार्ड – 530 , तलाठी यांचे उत्पन्नाचे दाखले – 31, आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्ड नोंदणी – 68 , प्राथमिक आरोग्य तपासणी व लसीकरण – 117 ,सरपंच रहिवासी दाखले – 22 , रमाई आवास योजना -7 , संजय गांधी निराधार /श्रावणबाळ योजना तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र – 12, वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन प्रस्ताव – 5 अशा एकूण 1499 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महसूल विभाग ,कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग तसेच पंचायत समिती, आरटीओ विभाग या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराचे संयोजक दादासाहेब जाधव, सुजित तात्या बागल यांचेसह हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुनील सावंत, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष रुपालीताई अंधारे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, बाजार समितीच्या सदस्य सौ केकानताई , पोथरे गावचे युवा नेते शहाजी झिंजाडे, कंदर चे सरपंच प्रतिनिधी भास्कर भांगे, पाडळी चे माजी सरपंच गौतम ढाणे, पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी दत्ता जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रहास बापू निमगिरे आदींनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
