करमाळाराजकीय

आमदार संजयमामा बबनदादा या शिंदे बंधुची जोडी सोलापुर जिल्ह्यासाठी वरदान-सरपंच भास्कर भांगे

आमदार बबनदादा शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असुन, दादांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!… खरं तर आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे हे बंधु आपल्या करमाळा, माढा तालुक्यासाठीच नाही तर सोलापुर जिल्ह्यासाठी वरदान रुपी आहेत.. अतिशय सर्वसामान्य माणसातुन घडलेली ही माणसे असुन, सोलापुर जिल्ह्याचे विकासासाठी शिंदे बंधुची कार्यशैली महत्वाची ठरली आहे.. माढा तालुक्याचा सर्वांगिण विकासाचे शिल्पकार म्हणुन आपण बबनदादांकडे पाहतो, त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यातही आज आमदार संजयमामा शिंदे यांचा विकासकामाचा धडाखा चालु आहे.. शिंदे कुटुबांचे आणि आमचे नाते जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे असुन ते अभेद्य आहे.. राजकारणात, समाजकारणात आम्ही नेहमी त्यांचे मार्गदर्शन घेत असतो.. मागिल पाच वर्षाच्या काळात आमदार संजयमामांचे मार्गदर्शन व सहकार्याने कोट्यावधी ची विकासकामे आणुन कंदर गावचा चेहरा मोहरा बदलुन टाकला आहे.. आणि यापुढील काळातही कंदर च्या विकासाला चालना देणार आहे.. अशी माहीती युवानेते सरपंच भास्करराव भांगे यांनी दिली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group