Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

साखर कारखानदारी चालवण्याचा आपला अनुभव जुना असून आदिनाथ ची सत्ता ताब्यात दिल्यास साखर कारखाना सक्षमपणे चालवु -माजी आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी साखर कारखानदारी चालवण्याचा आपला अनुभव जुना असून या क्षेत्रातील आव्हानावर मात करून सभासदांनी आदिनाथ ची सत्ता ताब्यात दिल्यास आदि नाथ सहकारी साखर कारखाना सक्षमपणे चालू असा विश्वास मा. आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केला.
करमाळा येथील विठ्ठल निवास या ठिकाणी करमाळा तालुक्याची एकेकाची कामधेनु असंलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मा.आ. संजय मामा शिंदे बोलत होते.
सध्या साखर कारखानदारी पुढे अनेक आव्हाने असून त्याचा सामना कारखान्यांना करावा लागत आहे. असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून निधीची हमी घेऊन आपण आदिनाथ कारखान्यास गतवैभव मिळवून देऊ असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
*करमाळा हीच कर्मभूमी*-
जन्मभूमी निमगाव असली तरी कर्मभूमी ही यापुढेही करमाळा तालुकाच राहील. माढा तालुक्यातील छत्तीस गावी तुटली तरी करमाळा हीच कर्मभूमी म्हणून काम करू, त्यामुळे विरोधकांनी माझ्या राजकीय भवितव्याची चिंता करू नये असेही ते म्हणाले. दरम्यान विधानसभा निवडणुकीत करमाळा तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करून आपल्यावर विश्वास दाखवला याबद्दल त्यांनी करमाळ्यातील जनतेचे आभार मानले. येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी
मा. आ.शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास टाकत त्यांच्या धोरणानुसार कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील आगामी वाटचाल असेल असे सांगितले.
यावेळी सुहास गलांडे सर, वामनदादा बदे, तात्यासाहेब मस्कर, विवेकराव येवले, पोपटराव सरडे, चंद्रकांत सरडे, राजेंद्र बारकुंड, सुजित तात्या बागल, आणि अजित विघ्ने यांची भाषणे झाली.
या विचारविनिमय बैठकीसाठी करमाळा तालुक्यातील संजय मामा समर्थक मोठ्या संख्येने हजर होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!