Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील अनुसुचित जाती जमाती नवबौध्द व विमुक्त जाती होतकरू ग्रामीण विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी समाजकल्याण विभाग दिलासा योजनेचा लाभ घ्यावा -मनोज राऊत

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्यातील अनुसुचित जाती जमाती/नवबौध्द व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील होतकरू ग्रामीण विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य घडविण्यासाठी समाजकल्याण दिलासा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.
जीवनात यशाची उंच भरारी घेण्याकरिता उपयुक्त स्पर्धा परीक्षांची पुस्तके/ शिकवणी घेणेकामी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर सन-२०२४- २५ करिता प्राप्त होणा-या निधीच्या “दिलासा योजनेंतर्गत तालुक्यातील U.P.S.C/ M.P.S.C पूर्व परीक्षा उत्तीर्ण परिक्षाचीना अर्थ सहाय्य करणे”या लेखाशिर्षांतर्गत करमाळा तालुक्यातील संघ लोकसेवा आयोग (U.P.S.C)पूर्व परीक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (M.P.S.C) यांचेमार्फत घेणेत आलेल्या पुर्व परिक्षा उत्तीर्ण असणा-या उमेदवारांना मुख्य परिक्षेच्या अभ्यासासाठी पुस्तके खरेदी/शिकवणी फी देणेकामी D.B.T तत्वावर अनुदान बैंक खातेवर वितरीत केले जाणार आहे. ग्रामीण भागात अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. बुध्दिमत्तेच्या बळावर शिक्षण क्षेत्रात यशाचा ठसा उमटवूनही घरच्या आर्थिक परिस्थिती अभावी पुढील शिक्षणात आगेकूच करताना विद्यार्थ्यांना निर्माण होणा- या समस्या या संपूर्ण बाबींचा सखोल विचार करून अशा होतकरू विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्रवासातील अडचणी दूर करण्याच्या उदात्त हेतूने समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांनी पुढाकार घेऊन सदर विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
अटी व शर्ती खालीलप्रमाणे असतील.
सदरची योजना हो अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/नवबौव्द व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील संघ लोकसेवा आयोग (U.P.S.C) पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (M.P.S.C) यांचेमार्फत घेणेत आलेली गट अ व गट ब पूर्व परिक्षा २०२३-२४ मधील उत्तीर्ण परिक्षाथ्यीकरिता लागू राहिल. • परिक्षार्थी हा बाटी/सारथी व अन्य कोणत्याही शासकीय योजनेतून यापुर्वी लाभ न घेतलेबाबत स्वर्य घोषणापत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक राहिल.
वय अधिवास दाखला (डोमासाईल) जोडणे आवश्यक राहिल.परिक्षार्थी यांचा जातीचा दाखला जोडणे आवश्यक राहिल. अर्जासोबत राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण असलेबाबतचा पुरावा म्हणून पूर्व परीक्षा निकाल प्रत व हॉलतिकीट सोबत सादर करणे आवश्यक राहिल.
आधार कार्ड सोबत जोडणे आवश्यक राहिल.
आधार कार्डशी संलग्न असलेले बॅंक खाते सोबत जोडणे अनिवार्य राहिल.लाभार्थ्यांचे अंतिम निवड करण्याचे अधिकार समाज कल्याण समितीस राहतील. देय अर्थसहाव्याचीरक्कम समितीमार्फत निश्चित करण्यात येईलवरील योजनेचा लाभ घेणारा परिक्षार्थी हा शासकीय/निमशासकीय सेवेत नसावा अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group