करमाळाशैक्षणिकसकारात्मक

पंडीत जवाहरलाल नेहरू रावगाव विद्यालयाची कु.हर्षदा फुंदेची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातुन शिष्यवृतीसाठी निवड

रावगाव प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा (NMMS) या परीक्षेत पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालय रावगाव ता. करमाळा जि. सोलापूर या विद्यालयातील विद्यार्थिनी कु हर्षदा बाबुराव फुंदे हिची शिष्यवृतीसाठी निवड झाली आहे. तिला इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी पर्यंत दरवर्षी १२०००रू प्रमाणे एकूण ४८०००रू मिळणार आहेत. या यशाबद्दल तिचे रावगांवचे सरपंच दादासाहेब जाधव ,उपसरपंच विष्णु गरजे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व ग्रामस्थ व संस्था अध्यक्ष काकडे साहेब सचिव भैयासाहेब काकडे व मुख्याध्यापकश्री कोळेकर सर,तसेच वर्गशिक्षक श्री. प्रताप बरडे सर,परदेशी सर,सरडे सर,रासकर सर,लांडगे मॅडम सर्व लोकांनी तिचे अभिनंदन करण्यात आले.आतापर्यंत या विद्यालयातील 59 विद्यार्थी या शिष्यव्रत्तीसाठी पात्र झालेले आहेत. तरी मार्गदर्शन कलेले सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष, व सचिवमुख्याध्यापक,सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व रावगांव ग्रामस्थ यानी अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group