ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाणीव असल्याने आपले ध्येय गाठतात -डाॅ.रविकिरण पवार
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते त्यामुळे ते आपले ध्येय गाठतात ध्येयापासून विचलित होत नाहीत असे मत डॉ.रविकिरण पवार यांनी व्यक्त केले ते ज्ञानसागर समूह ,कोर्टी यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की बहुतांश पालकांची परिस्थिती बेताचीच असते आशा मध्ये मुलांना शिकवणे म्हणजे तारेवरची कसरत असते परंतु मुले ही याची जाणीव ठेवतात त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थि आज उच्च पदापर्यंत जात आहेत या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे
: दहावीला कमी मार्क पडले तरी निराश होऊ नका दहावीला कमी मार्क पडून ही कित्येक विद्यार्थी अथक परिश्रम करतात आणि एमपीएससी यूपीएससी तसेच स्पर्धा परीक्षा पास होतात
केवळ कमी मार्क पडले म्हणून निराश होऊ नका असे मत बँक ऑफ इंडियाचे अधिकारी तळेकर म्हणाले
ज्याप्रमाणे वेगापेक्षा दिशा महत्त्वाची असते यासाठी दिशा देणारा शिक्षक हवा तुमच्या तिल चूक लक्षात घेऊन त्याला मार्गदर्शन केल्यास निश्चितच तुम्ही उत्तुंग यश मिळवू शकता असे मत कोर्टी येथील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत यवगे यांनी व्यक्त केले
गुणवंत विद्यार्थी त्रिवेणी वाघमारे, ऋतुजा अनारसे ,तनुजा अभंग यांच्यासह अनुष्का दगडे ,निकिता चव्हाण, संध्याराणी शिंदे ,तनुजा गायकवाड, सायली जाधव ,भाग्यश्री भांडवलकर, पूजा झाकणे ,राधिका पवार , यास्मिन शेख , शिवश्री जाधव या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात ज्ञानसागर समूहाचे रोहिदास शिंदे ,विनय नवले,डॉ.रवीकिरण पवार ,डॉ. हेमंत यवगे,मॅनेजर राहुल तळेकर ,डॉ. बंडगर , डॉ.मंजुषा टेकाडे,आंजना मेढे, मनोज बुराडे ,नरेंद्रसिंह ठाकूर , डी, डी ,शिंदे ,आकाश धेडे ,सनी गुणवरे, अमोल शिन्दे, अक्षय ओहोळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले.
