कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंत परिवाराकडून बैलपोळा घरीच उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा बैलपोळा सण सावंत परिवाराकडून घरच्या घरी पण उत्साहपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
जुन्या रूढी परंपरेनुसार बैलांचे विधिवत पूजन करण्यात आले.
सालाबादप्रमाणे कोरोनाजन्य परिस्थितीत देखील बैलपोळा सणाची परंपरा जपण्याचा प्रयत्न सावंत परिवाराकडून करण्यात आला.
यावेळी विठ्ठल आप्पा सावंत, गोपाळ बापू सावंत, भगवान नाना सावंत, दादासाहेब सावंत , अॅड. राहुल(भाऊ )सावंत, संजय पप्पू सावंत, सुनील सावंत , किरण सावंत, पै. गणेश सावंत, डॉ संकेत सावंत व सावंत परिवारातील सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते..


