Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या पन्नास बेडची सुविधा असुन शंभर बेडची सुविधा करण्याची अमरजित साळुंके यांची मागणी.

करमाळा प्रतिनिधी-. करमाळा येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात. सध्या ५० रुग्णांना ऍडमिट करण्याची सुविधा आहे, ही मर्यादा वाढवत कायमस्वरूपी १०० बेड ची व्यवस्था करावी अशी मागणी करमाळा तालुक्यातील युवा नेते अमरजित साळुंके यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जि.प.अध्यक्ष अनिरुध कांबळे, युवा नेते अजित तळेकर,भारत पाटील, भाजपाचे शहर अध्यक्ष जगदिश अगरवाल, सिनेट सदस्य दिपक चव्हाण, सरपंच तात्या गोडगे, ज्ञानेश्वर पवार, वीट येथील उद्योजक अशोक चोपडे आदी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी सी टी स्कॅन मशीन, सोनोग्राफी मशीन, रक्त पेढी आदी सुविधा देखील उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी निवेदनात केली आहे. वरील सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना सोलापूर, अहमदनगर, पुणे येथे काही तपासण्या कराव्या लागत असून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे अतोनात हाल होत आहेत व खूप मोठे नुकसान होत आहे. तरी लवकरच या सुविधा उपलब्ध होणे कामी आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी अमरजित साळुंके यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group