उजनी धरणात पाणी पातळीत वाढ झाल्याने बळीराजा सुखावला.

वाशिंबे प्रतिनिधी उजनी जलाशयाला पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी काठावर विद्युतपंप काढण्यासाठी शेतकरी बांधवाची लगबग चालू झाली आहे.
मागील आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोलापूर, जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात झपाट्याने वाढ होत आहे. आज असणारा उपयुक्त पाणीसाठा रविवार,१७ रोजी ५१ टक्के झाला आहे.
दौंडमधून येणार्या मोठ्या विसर्गामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. उजनी धरणात लक्षणीय वाढ पाहता ऑगस्ट अखेर धरण शंभरी ओलांडणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने लाभक्षेत्रातील बळीराजा सुखावला असुन आनंदाचे वातावरण पसरले आहे.
