करमाळासकारात्मक

करमाळा शहरातील मोकाट जनावराचे नखे काढण्याचा काँग्रेस पक्षाचा सामाजिक उपक्रम

करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात अनेक फिरसते जनावर रस्त्यावर फिरतात अशा फिरसते जनावरांचे पायातील वाढलेले नखे .शिंगे काढण्याचे काम सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांचे सहकार्याने करमाळा शहरात चालूआहे
यावेळी सावंत म्हणाले की. कोरोना या महामारी आजाराचे सावट संपूर्ण जगात असुन मुक्या जनावरांकडे कोणी ही लक्ष देत नाही त्यातच बैलाचा बैलपोळा सण आला असुन या जनावराचे मालक सुध्दा जनावरांकडे कडे लक्ष देत नाही त्या मुळे काँग्रेस पक्षाचे वतीने शहरातील मोकाट जनावरांच्या वाढलेले नखे शिंगे काढण्याचा उपक्रम काँग्रेस पक्षाचे अस्लम नालबंद. हाजी महमंदभई बागवान.बबु बेग आकबर बेग योगेश काकडे . साहील पठाण. कल्याण गुणवरे रमेश हवालदार आदीजण करत आहे या उपक्रमाचे करमाळा शहरात सर्वत्र कौतुक होत आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group