श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी विचार विनिमय करण्यासाठी प्रा.रामदास झोळ यांनी बोलवली 12 मे रोजी बैठक
करमाळा, प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीचे बिगुल गुरूवारी वाजले असुन निवडणुक जाहीर होताच या निवडणुकीत बचाव समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याविषयी बचाव समितीने आपली भूमिका स्पष्ट केली असून निवडणुकी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मकाई सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी शुक्रवार दि. 12 मे रोजी सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. बायपास रोडवरील हॉटेल राजयोग येथे ही बैठक होणार आहे.तरी या बैठकीला मकाईच्या हितचिंतकांनी आणि मकाई बचाव समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. झोळ यांनी केले आहे.