जरीन मुजावर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
करमाळा
हिसरे येथील संगणक अभियंता जरीन उर्फ हिना शोएब मुजावर (वय 30) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात सहा महिन्याचा मुलगा, पती, सासू , सासरे, दिर, जाऊ, आई, वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. हिसरे येथील रेशन दुकानदार जहिर शेख यांच्या त्या ज्येष्ठ कन्या व विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव असलम शेख यांच्या त्या बहिण होत.जरीन मुजावर यांचे अल्पवयात आकस्मिक निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हिसरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी सर्वस्तरातील नागरिक उपस्थित होते.
