रामाचे वास्तव्य असलेल्या कण्वमुनी यांची जन्मभुमी असलेल्या कंदरच्या राम मंदिरास तीर्थक्षेत्र विकास निधीतून भरघोस निधी देण्याची मागणी
कंदर प्रतिनिधी कंदर ही संताची पावनभूमी असून कण्वमुनी यांचा जन्म कंदर या गावात झाला .त्रेता युगामध्ये राम लक्ष्मण सिता तिन्ही हनुमानसह येथे वास्तव्य असल्याचे पौराणिक दाखले असून रामाने स्थापन केलेले शिवलिंग सीतामाईची नाहणी व स्वयंभू गोमुख असून त्यामुळे त्यामधून गंगामाई प्रकट झाली आहे त्यामुळे येथील भुमीला विशेष महत्व आहे हे देवस्थान बऱ्याच कालावधीपासून दुर्लक्षीत आहे. शासनाकडुन याकडे दुर्लक्ष होत होत आहे. या राम मंदीराला शासनाकडुन तिर्थक्षेत्र योजनेतुन निधी मिळावा अशी मागणी येथील ग्रामस्थाकडुन भाविकाकडुन करण्यात आली आहे.रामनवमी निम्मित दरवर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते सात दिवस निखिलमहाराज यांची रामकथा याचे आयोजन केले असुन भाविकांना अन्नदान करण्यात आले असुन दररोज दिड ते दोन हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. त्रेतायुगात राम वनवासात असताना येथे आले होते .कण्वमुनीच्या सहवासात कंदर ही एक संताची भुमी आहे. कंदर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये आनंदात रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो लोकवर्गणीतून हा उत्सव साजरा करण्यात येत असून अखंड राम कथा सप्ताह आयोजनही या काळात करण्यात आली होते. सातही दिवस कथानुसार देवाचे प्रसंगानुसार विविध अभिरुप देखावे सादर करण्यात आले. हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कण्वमुनी राम मंदिराचे बापू दत्तात्रय माळी ( पुजारी ) बाळासाहेब विनायक लोकरे,नानासाहेब लोकरे,विठ्ठल काळे,चैतन्य दिगंबर पाठक, धर्मराज नवनाथ लोकरे,सुभाष पवार, राजकुमार सरडे हे परिश्रम घेत असुन त्यांनी शासनाकडुन दुर्लक्षित देवस्थानासाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतुन निधी देण्याची मागणी कंदर ग्रामस्थाच्यावतीने करण्यात आली आहे.
