अन् नर्मदा आजी ढसाढसा रडल्या
‘जनशक्ती’ संघटना धावली मदतीला
घरकुल, शौचालय देण्याचे प्रशासनाकडे केली विनंती
करमाळा प्रतिनिधी
वय वर्ष ७०… पोटाला व वंशज नाही… काठीचा आधार घेऊन आपल्या ‘धन्या’ सोबत गुण्यागोविंदाने म्हातारपणीचा संसार सुरू होता… अशातच गेल्या वर्षी कुंकवाने देखील साथ सोडली… माणसाने भरलेल्या जगात नर्मदा आजीला साथ देणार कोणीच नाही… दरम्यान जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांचा करमाळा तालुक्यात गाव भेट दौरा सुरू आहे… बोरगाव येथे अतुल भाऊंचा ताफा आला… शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या… अशावेळी काठी टेकत टेकत एक वयोवृद्ध येताना दिसली… अतुल भाऊंना पाहून ढसाढसा रडू लागली… त्यावेळी अतुल भाऊंनी जनशक्ती संघटनेच्या वतीने मदतीचा हात तर दिलाच शिवाय प्रशासनाला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून घरकुल आणि शौचालयाची सोय करण्याची विनंती त्यांनी केली.
करमाळा तालुक्यातील बोरगाव येथे गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने वयोवृद्ध असलेल्या नर्मदा अंकुश दळवी यांची भेट जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांच्याशी झाली. यावेळी जगण्यासाठी सुरू असलेला मरणा कडला संघर्ष सांगताना नर्मदा आजी धाय मोकलून रडल्या. आजीला मायेचा आणि पुत्रत्वाचा आधार देत अतुल भाऊंनी आर्थिक मदतीचा हात तर दिलाच. शिवाय तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी वाखरे, ग्रामसेवक आर.एन. मुंडे या प्रशासनातील अधिकाऱ्यांना फोन लावून नर्मदा आजींना जागा उपलब्ध करून त्यांना घरकुल आणि शौचालय देण्याची विनंती केली. यासाठी त्यांनी स्वतः कागदपत्राची पूर्तता करण्याची हमी देखील यावेळी दिली.
दरम्यान शेतकरी पुत्र असणाऱ्या अतुल खूपसे पाटील यांनी आपल्याला दिलेली आर्थिक मदत, समोर बसूनच प्रशासनाला केलेले फोन पाहून भारावलेल्या आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आणि त्यांनी जनशक्ती संघटनेचे आभार मानले.
