मास्तर ते यशस्वी उद्योजक दयानंद सुर्यवंशी
* दयानंद सूर्यवंशी याचा जन्म एका माजी सैनिक शेतकरी कुटुंबात झाला वडील माजी सैनिक आई गृहिणी अशा परिस्थितीमध्ये दयानंद यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले व त्यानंतर प्रिंटिंग प्रेस व्यवसायास सुरुवात केली बारावीला असताना डीएडला जाण्याचा मानस त्यांचा होता पंरतु त्यावेळी लग्न पत्रिकेचा सीझन असल्यामुळे लग्नपत्रिका छापताना अभ्यास करता न आल्याने डि एड परिक्षेत कमी मार्क मिळाल्याने मास्तर होण्याची संधी गेली यानंतर दयानंद यांनी हार न मानता पुढील शिक्षण चालू ठेवले बीए झाल्यानंतर दिवेगव्हाण येथील खाटमोडे परिवारातील रमाबाई यांच्याशी संगोबा त्यांचा आदिनाथ मंदिरात विवाह झाला 50 अवघ्या माणसाच्या कोंटुबिक सदस्यांच्या उपस्थितीत लग्नाचा गाजावाजा न करता सायकलवर वरात काढून साध्या पध्दतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. रमाबाई यांना भाऊ नसल्याने भावाची जबाबदारी व आई-वडिलांची जबाबदारी दयानंद यांनी घेतल्यामुळे सासऱ्यांनी त्यांना मानसपुत्र मानल सासऱ्याच्या संपत्तीचा कुठलाही मोह न बाळगता कष्ट हेच भांडवल मानुन दगडी रोडवरील स्वामी समर्थ प्रिंटिंग प्रेस च्या माध्यमातून शून्यातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सायकलवर प्रवास करून हजार पती ते लखपती असा प्रवास केला आहे. आजच्या युवकांना व्यवसाय करण्याची लाज वाटते धंदा आपले काम नाही मराठी माणुस व्यवसायात यश मिळु शकत नाही. अशा परिस्थितीतही आर्थिकदृष्ट्या संप्पन होऊनही पत्र्याच्या घरामध्ये राहून सुखी संपन्न आयुष्य जगत कृत्रिम श्रीमंतीचा देखावा न करता साध्यापद्धतीने निर्व्यसनी जीवन जगणारे अवलिया म्हणून दयानंद सूर्यवंशीयांना बघितले जाते. हॉटेलचा नाद नाही चार चाकी गाडीची हाऊस मौज नाही. कुठलाही बडे जाऊपणा नाही अशा परिस्थितीत सगळे असूनही त्यागी वृत्ती ही घेण्यासारखी आहे.प्रसिध्दीपणापासुन अलिप्त असणारे श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये दयानंद सूर्यवंशी व त्यांची धर्मपत्नी रमाबाई यांनी खंबीर साथ देऊन प्रतिकुल परिस्थितीवर मात करून सुखी समृध्द जीवन जगत असुन एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे .त्यांच्या कुटुंबाचा आदर्श घेऊन त्यांचा मुलगा आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून यशवंतराव महाविद्यालय येथे शिक्षण घेत असून त्याचे भविष्य उज्वल आहे .आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करुन आपल्या पायावर उभा राहणे ही काळाची गरज आहे. मोठेपणाचा बडे जाऊपणा करुन कर्जबाजारी होण्यापेक्षा आपली परिस्थिती जशी असेल त्या समाधान मानून आपली परिस्थिती सुधारणा सुधारण्याचा प्रयत्न करावा व त्यातून उन्नती करावी हे दयानंद सूर्यवंशी चे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे त्यांच्या वाढदिवसाच्या
भावी वाटचालीस लाख लाख हार्दिक शुभेच्छा
