कुकडीचे ओव्हरफ्लोचे अतिरिक्त पाणी मांगी तलावात सोडण्याचे आदेश आमदार संजय मामा शिंदे यांच्या मागणीला यश तालुक्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण

करमाळा प्रतिनिधी . करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने माणसाच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली मांगी परिसरातील इतर पाझर तलाव पाण्याची नितांत गरज आहे. सध्या कुकडीचे अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे हे पाणी मांगी व इतर पाझर तलावात सोडण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे
आमदार संजय मामा शिंदे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकारी गजानन गुरुव यांनी सोमवारी अधीक्षक अभियंत्यांना या आदेशाचे पत्र दिले आहे .याबाबत आमदार संजय मामा शिंदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे कुकडी तलाव सध्या 97 टक्के क्षमतेने भरला आहे. त्यातील अतिरिक्त पाणी वाहून जात आहे. हे पाणी कुकडीच्या डाव्या कालव्याद्वारे कर्जत तालुक्यातील गावांना सोडण्यात आले आहे. हेच पाणी उजव्या कालव्याद्वारे मांगी तलावात सोडावे मांगी गावचा 20 टक्के पाणी साठा आहे. . पुढील नियोजनासाठी हे पाणी सोडणे आवश्यक आहे. हे पाणी सोडल्यास या तलावा खालील मांगी ,वीट ,मोरवड पिंपळवाडी, झरे, पुनवर, वडगाव ,रावगाव, वंजारवाडी ,जातेगाव, हिवरवाडी, भोसे , या गावातील पाझर तलावातुन तर पाझरतलावातुन पोथरे,बिटरगाव ,निलज, धायखिंडी, खांबेवाडी, करंजे,भालेवाडी, या गावांना मांगी तलावातुन पाणी पुरवठा होऊ शकतो अशी मागणी करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी केली होती त्यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर कुकडीचे अतिरिक्त पाणी मांगी तलावात सोडण्याचे आदेश दिल्याने जनतेमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
